लेखिका: किर्तीसंध्या, मुंबई
साहित्यिक व विचारवंत
“खाण्यास कोंडा व निजेला धोंडा” ही म्हण ऐकली आहे का आपण?
पुर्वीच्या काळी कोंडाची भाकरी खाउन गरीब प्रचंड परीश्रम करायचे व डोक्याखाली धोंडा म्हणजे दगड घेतला तरी त्यांना शांत झोप लागायची. आजच्या सारखा ऐषोआराम त्याकाळी नव्हता म्हणुन तर महापुरुष घडले.
गेल्या 20 वर्षात हेल्दी खाणे, चमचमीत खाणे, चित्रविचित्र थाळ्या, टकाटक राहणे, शरीर सजावट करणे, मनोरंजन आवश्यक, हसा, खेळा, खुश रहा… वैगैरे अनावश्यक गोष्टींवरच वरच भारत देशात अब्ज रुपयांचा चुराडा होतो आहे..
पण खरे तर सर्व महापुरुषांचे चरित्र वाचा. त्यांनी उपाशी पोटी शिकुन, जागरण करुन, मिळेल ते खाऊन, समाजसेवा केली आहे…
त्या सर्वांच्या उपकारामुळे तुम्ही आम्ही ताठ मानेने समाजात वावरत आहोत…
त्यांची ईम्युनिटीला केव्हा काही झाले का?
त्यांना बदाम खायला नाही मिळाले म्हणुन त्यांची ईंटेलिजेन्सी तसुभरही कमी झाली का?
विचार करा रे…… तरुणांनो….
व्यापार वृत्तीला फुलवण्यासाठी, कमावण्यासाठीचा सर्व चाललेला ठोकताळा हा.. केव्हा प्रकाश पडणार तुमच्या मेंदुत.
1 पैसा खर्च करताना तो तुम्ही कमावलात का? हा विचार करा मग तो खर्च करा.
अरे एखाद्याने सोन्याची सरी घातली म्हणुन आपण फासाची दोरी गळ्यात घालु नये..
लाज चोरी, व्यसन, आळशीपणा, कामचुकारपणा, खोटेपणा याची वाटु द्यावी…
गरीबीची कधीही लाज वाटु देऊ नये..
पैशासाठी मी गैरमार्ग नाही स्विकारला याचा स्वताला अभिमान बाळगावा..
समाज काय म्हणेल ह्यापेक्षा तुझे मुलेबाळे तुला काय म्हणतील याचा विचार करावा.
जग हसायला येतो, पोसायला नाही.
तुम्ही आनंदाने काहीही खाल्लेत तरी त्याचेही पोषक रक्तच बनते….
पण खाताना वृत्ती समाधानी असावी.. जिभेच्या चोचल्यांसाठी खाऊ नये…
जगण्यासाठी जेवावे …. रे
जेवणासाठी जगु नये…
★★★★★★★★★★★★★★★★★★★ आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

