उमेश इंगळे, अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- गरिबिवर मात करत आपल्या आईवडिलांचे स्वप्न सत्यात उतरुन तहसिलदार बनलेल्या तथा खुप कमी कालावधीत आपल्या कामाचा ठसा उमटवणारे अकोला चे माजी तहसिलदार तथा सध्या यवतमाळ चे तहसिलदार म्हणून कार्यरत असलेले लोकप्रिय, शिस्तप्रिय अधिकारी मा बळवंत अरखराव यांची तहसिलदार पदावरून उपजिल्हाधिकारी पदी बढती (प्रमोशन) झाल्या बद्दल त्यांच्या अकोला येथील निवासस्थानी जाऊन सामाजिक कार्यकर्ते यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे, ॲड रोशन तायडे, अक्षय अगिनकर, विशाल भोसले, सिध्दांत वानखडे, रुषिकेश वानखडे, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख समीर खान आदि सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

