राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
मो न 9518368177
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- गोंडपिपरी नगरातील २.५ कोटी रुपयांची विविध विकास कामांचे भूमिपूजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या मध्ये सत्र २०२२-२३ च्या अर्थिक वर्षातील महाराष्ट्र राज्य अग्नीसुरक्षा अभियान योजना (जिल्हास्तर) व अंतर्गत अग्निशमन सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांचे निवासस्थान बांधकाम करणे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगारोत्थान महा अभियान योजना अंतर्गत प्रभाग क्र ११ मधील जयसेवा चौकाचे सौंदरीकरण करणे. प्रभाग क्र. १० मधील दर्गा रोड ते बोबटे यांच्या घरापर्यात खडीकरण करणे. प्रभाग क्र. १२ साईनाथ मास्टे ते रवी सोनटक्के यांचे घरापर्यंत कव्हर नाली बांधकाम करणे. प्रभाग क्र. १६ मधील सरोज मेश्राम ते अशोक भोयर यांचे घरा पर्यंत कव्हर नाली व सिमेंट काँक्रेट रस्ता बांधकाम करणे, प्रभाग क्र. १६ मधील रवी गेडाम ते भय्याजी कुळसंगे कव्हर नाली बांधकाम करणे.
नागरी दलितत्तर सुधार योजना अंतर्गत प्रभाग क्र. १७ मधील श्री साईनाथ झुंगरे ते छाया बोरकुटे कव्हर नाली व पेव्हर्स बांधकाम करणे. प्रभाग क्र. १ मधील मनोज तुंदुरवार किराणा दुकानापासून ते मनोज माकोडे यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रोड बांधकाम करणे.
अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रात क्षेत्र विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्र. १ मधील कब्रस्तानाला संरक्षण भिंत बांधकाम करणे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रभाग क्र. ४ मधील श्रीमती फुलाबाई नगारे ते व्यंकट पूर बायपास रोड पर्यंत एका बाजूने कव्हर नाली बांधकाम करणे. प्रभाग क्र. २.मधील गोंडपिपरी मूल रोड ते गंधर्व फुलझले यांचे घरार्यंत दोन्हीं बाजूंनी कव्हर नाली बांधकाम करणे.
या प्रसंगी नगराध्यक्षा सविता कुळमेथे, मुख्याधिकारी आशिष घोडे, उपनगराध्यक्षा सारिका मडावी, बांधकाम सभापती अनिल झाडे, महिला बाकल्याण सभापती वनिता देवगडे, पाणी पुरवठा सभापती सुनील संकुलवार, तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, महिला तालुकाध्यक्ष सोनी दिवसे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, संभाजी येलेकर, नगरसेवक राकेश पून,सचिन चिंतावार, वनिता वाघाडे, यादव बांबोळे, सुरेश चिलनकर, रंजना रमगिरकार, , मनोज नागापुरे बालाजी चनकापुरे, नामदेव सांगडे, संचालक कृ.उ.बा.स. तथा युवक तालुकाध्यक्ष संतोष बंडावार, श्रीनिवास कंदनुरीवार, रेखा रामटेके, नागरिक उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

