✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी मोबाईल न. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- राज्य शासनामार्फत महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती महिलांना उपलब्ध व्हावी. तसेच महिलांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वर्धा जिल्हातील सेलू व कारंजा येथे दि.23 मे रोजी, देवळी, आर्वी व समुद्रपूर येथे दि.24 मे रोजी, वर्धा येथे दि.25 मे रोजी, आष्टी येथे दि.26 मे रोजी व हिंगणघाट येथे दि.30 मे रोजी स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या महिलांना काही समस्या अथवा तक्रारी सादर करावयाच्या असतील अशा महिलांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या स्तरावरुन तयार करण्यात आलेला विहित नमुन्यातील तक्रार अर्ज अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्राम बाल संरक्षण समिती, ग्रामसेवक, तलाठी व एनएमएन यांच्या माध्यमातून प्राप्त करुन घ्यावा.
सदर तक्रार अर्ज भरुन संबंधित तालुक्याच्या स्त्री शक्ती समाधान शिबिरस्थळी तक्रार अर्ज ज्या विभागाशी संबंधित आहे, त्या विभागातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना सादर करावा, असे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

