Monday, March 2, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणांसाठी निधी उपलब्ध करून देणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 22, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणांसाठी निधी उपलब्ध करून देणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter


वैद्यकीय सेवेमुळे रुणांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे
पोंभूर्णा येथे ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण


सौ. हनिशा दुधे तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
चंद्रपूर दि. 21 ऑगस्ट :
पोंभूर्णा तालुक्यात ग्रामीण रुग्णालयाची प्रशस्त इमारत उभी झाली आहे. येथे वेदना आणि दुःख घेऊन येणा-या रुग्णांना वैद्यकीय सेवा वेळेत उपलब्ध करून दिली तर त्याच्या चेहऱ्यावर हास्य आणि आनंद झळकते. विशेष म्हणजे रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचा-यांच्या आपुलकीच्या भावनेने 50 टक्के रुग्ण आधीच बरा होतो. ग्रामीण रुग्णालयाच्या सुसज्ज अशा इमारतीकरीता अत्याधुनिक उपकरणांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
पोंभूर्णा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष सुलभा पिपरे, उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार, आरोग्य उपसंचालक डॉ.विनिता जैन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, देवराव भोंगळे, उपविभागीय अधिकारी श्री. ढवळे, तहसीलदार शुभांगी कनवाडे, कार्यकारी अभियंता अनंत भास्करवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, पोंभुर्णा वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत गेडाम, डॉ. शुभम तुमराम, डॉ. संदेश मामीडवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
रुग्णालयात सेवा देताना पवित्र भावना ठेवून कामे करावे, असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, आजारी व्यक्तीचं दुःख आणि वेदना दूर करण्याच्या दृष्टीने या रुग्णालयात आवश्यक साहित्यासाठी निधी निश्चितपणे उपलब्ध करून देण्यात येईल. मागील दोन वर्ष ग्रामीण रुग्णालयाची इमारत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होती. आज सर्व साहित्यासह या रुग्णालयाचे लोकार्पण झाले. या रुग्णालयात पदभरती झाली असून उर्वरित पदे लवकरच भरले जाईल. नगरपंचायत इमारत, स्टेडियम, आयटीआय यासारखी 18 पेक्षा अधिक कामे या तालुक्यात झाली आहेत.मंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, येत्या काळात पोंभूर्णा तालुक्यात माळी समाज बांधवांसाठी उत्तम असे समाज भवन उभारणीचे काम होणार आहे. बाहेर तालुक्यातील विद्यार्थी या ठिकाणी येऊन शिक्षण घेईल, अशी होस्टेलची सुसज्ज इमारत या ठिकाणी उभी राहणार आहे. कृषी क्षेत्रात काम करणे गरजेचे असून मूलच्या सोमनाथ येथे कृषी महाविद्यालय सुरू केले. कृषी तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण देण्यासाठी अजयपूर येथे 75 कोटीचे प्रशिक्षण केंद्र सुरू होत आहे. जलसंधारणाच्या माध्यमातून येत्या दोन वर्षात तलावामध्ये पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या अमृत महोत्सवी वर्षात मुल येथे उत्तम आरोग्य सुविधा असलेले 100 बेडचे रुग्णालय करण्यात येणार आहे. चंद्रपुरात रोजगाराच्या दृष्टीने काम करण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी 10 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून डिसेंबर अखेरपर्यंत निवासस्थानाचे बांधकाम पूर्णत्वास येईल. कृषी अधिकाऱ्यांसाठी कृषी विभागाची उत्तम इमारत उभारण्यात येईल. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी म्हणजेच पुढील 1 जुलै रोजी त्याचेसुद्धा उद्घाटन निश्चित केले जाईल. विकास कामांमध्ये चंद्रपूर जिल्हा एक मॉडेल व्हावा तसेच इतर जिल्ह्यांना हेवा वाटेल, असे काम या जिल्ह्यात करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असेही ते म्हणाले.
रुग्णालयास आवश्यक जे साहित्य लागेल ते मानव विकास, सीएसआर, डीपीडीसी नाविन्यपूर्ण, आमदार निधीतून निधी मागणी करून साहित्य उपलब्ध करून घ्यावे. रुग्णालयात सोलरसाठी निधी तसेच ॲम्बुलन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आवश्यक साहित्य प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येईल.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी आपल्या प्रास्ताविकेतून सांगितले की, पोभूंर्णा तालुक्यात दोन प्राथमिक आरोग्य केंद्र व 18 उपकेंद्र आहेत. पोंभूर्णा तालुक्याच्या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून ग्रामीण रुग्णालय अस्तित्वात नव्हते. येथील नागरिकांना अत्यंत प्राथमिक स्वरूपाच्या आरोग्य सुविधेसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागत होते. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या ग्रामीण रुग्णालयाच्या निर्मितीसाठी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. अविरत पाठपुरावा व प्रयत्नामुळे आधुनिक व प्रशस्त असे ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम पूर्णत्वास येऊन आज लोकार्पण होत आहे. पोभूंर्णा येथे 17 जानेवारी 2013 रोजी 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले. रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या बांधकामाकरिता 14 कोटी 87 लक्ष निधी मंजूर झाला व हे रुग्णालय पूर्णत्वास आले. रुग्णालयीन कर्मचाऱ्यांची पद निर्मिती झाली असून सदरील पदे टप्प्याटप्प्याने भरण्यास सुरुवात झाली. आज अखेरपर्यंत 90 टक्के पदे भरण्यात आली आहे. त्यासोबतच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 25 निवासस्थानाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. या रुग्णालयात प्राथमिक स्वरूपाच्या तपासण्या उपलब्ध होणार असल्याने प्रयोगशाळा कक्ष, आंतररुग्ण कक्ष, इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे तत्पूर्वी, मंत्री श्री मुनगंटीवार यांच्या हस्ते वृक्षारोपण व पाच दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकलचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला अलका आत्राम यांच्यासह सर्व नगर परिषद / पंचायतीचे पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

घुग्गूस शहरातील निर्माणाधीन रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम प्राधान्याने पूर्ण करा – मंत्री सुधीर मुनगंटीवार

Next Post

सतीश धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सतीश धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप.

सतीश धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In