श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- कोरोनाच्या काळात कोट्यवधी रुपयांची बोगस खरेदी दाखवून शासनाला चुना लावणाऱ्या स्टोर किपर अजिनाथ मुंडे याची बीड जिल्हा रुग्णालयात झालेली बदली तडकाफडकी रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र संदेश न्युज ने याबाबत वृत्त दिल्यानंतर त्याची दखल शासनाने घेत ही बदली रद्द करण्यात आली आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या काळात स्टोर किपर असलेल्या अजिनाथ मुंडे याने डॉ. जयश्री बांगर, गणेश बांगर, राजरातन जायभाय यांच्या सोबत स्वताच्या नावावर कंपनी स्थापन करून कोट्यवधी रुपयांची बोगस साहित्य खरेदी केली. याबाबत महाराष्ट्र संदेश न्युज ने सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर मुंडे यांची बदली हदगाव येथे झाली होती. मात्र मध्यंतरी त्याने पुन्हा बीडला रुजू होण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला सीएस डॉ. सुरेश साबळे यांनी रुजू करून घेतले नव्हते. दरम्यान सरकार बदलल्यानंतर मुंडे याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वशिला लावला. स्थानिक पदाधिकारी यांनी त्यासाठी आपले वजन खर्ची घातले अन आपल्या पदरात देखील वजन पाडून घेतल्याची चर्चा होती. आठ दिवसांपूर्वी मुंडे याने बीड येथे बदली करून आणली.याबाबत महाराष्ट्र संदेश न्युज ने रविवारी बातमी प्रकाशित केली होती. त्याची दखल आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली.
मुंडे यांची एसीबी आणि विभागीय चौकशी सुरू: वादग्रस्त असलेले मुंडे यांची कोट्यवधी रुपयाच्या भष्ट्राचार प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागा तर्फे आणि विभागीय चौकशी सुरू आहे. असे असताना त्याला पुन्हा बीडला रुजू करून घेतल्यास या चौकशी वर परिणाम होऊ शकतो, म्हणून त्याची बदली तातडीने रद्द करण्यात आली आहे.
शासनाचे पैसे लुटणाऱ्यावर कठोर कारवाई करा: शासनाचे कोट्यवधी रुपयाची लूट करणाऱ्या अशा अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बीड येथील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते

