संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका आईने आपल्याच पोटच्या दोन अल्पवयीन मुलींना देहव्यापार करण्यासाठी गोव्यात विक्री करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे या प्रकरणाचा भांडाफोड झाला. या प्रकरणात पोलिसांनी विजय टोनी या दलालाला अटक केली आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं ही महिला आपल्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून देहव्यापार करत होती, अशी माहिती समोर येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, नागपूरमध्ये एका महिलेनं आपल्याच दोन मुलींना देहव्यापारासाठी गोव्यात विकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. अर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं ही महिला आपल्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून देहव्यापार करत होती. मात्र जास्त पैसे कमविण्याची लालसेनं तिने आपल्या पोटच्या 13 आणि 16 वर्षांच्या मुलींनाही यात ढकलले.
पोलिसांच्या सतर्कतेमुळं अनर्थ टळला जास्त पैसे मिळतील या लालसेतून आईनेच विजय टोनी या दलालामार्फत आपल्या दोन मुलींना देहव्यापारा साठी गोव्यात विकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडकीस आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी दलाल विजय टोनी याला अटक केली असून, दोन मुलींची सुटका केली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

