संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतीनिधी
चंद्रपूर:- सविस्तर खालील प्रमाणे आहे. बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष सतीश धोटे यांच्या वाढदिवसा निमित्याने बादल बेले यांच्या मार्गदर्शनात आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथील विध्यार्थीना शैक्षणिक साहित्य वाटप करून सतीश धोटे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे, आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर, राष्ट्रीय हरित सेना प्रमुख तथा छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट लीडर बादल बेले, ज्योती कलूरवार, रोशनी कांबळे, वैशाली टिपले, जयश्री धोटे, सुनिता कोरडे, अर्चना मारोटकर, आदर्श हायस्कुल चे नवनाथ बुटले, मेघा वाढई, प्रशांत रागीट, आशा बोबडे, विकास बावणे, भाग्यश्री शिरसागर, मयुरी विधाते, वैशाली चीमुरकर, स्वीटी सातपुते आदी शिक्षकांची उपस्थिती होती.
सतीश धोटे यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येतो. कधी वृक्षारोपण तर कधी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येतात.