पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
गुन्हे शाखा युनिट १, पिंपरी चिंचवड शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. २२/०५/२०२३ रोजी चिखलीगांव कमानी शेजारी कृष्णा ऊर्फ सोन्या तापकिर याचा मोटार सायकल वरुन आलेल्या दोन इसमांनी भरदिवसा फायरिंग करुन खुन करुन पळुन गेले होते. सदर खुनाच्या अनुषंगाने चिखली पोलीस ठाणे गु. रजि.नं. ३४६ / २०२३ भादवि कलम ३०२. १२० ( ब ) भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) (२७) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयाचे अनुशंगाने मा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे सो, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे यांनी गुन्हे शाखा युनिट १ चे पोनि संतोष पाटील यांना तात्काळ आरोपीना शोधुन ताब्यात घेण्याबाबत आदेश दिले. सदर गुन्हयाचा समांतर तपासादरम्यान गुन्हा घडल्यापासुनच पोनि. संतोष | पाटील यांनी वेगवेगळी दोन पथके चिखली, पुनावळे, मोईगांव, यवत, ता. दौंड, ता. बारामती या भागात रवाना केली होती. आरोपीचा शोध घेत असताना गोपनिय बातमीदार व तांत्रिक | विश्लेषणाव्दारे उपलब्ध झालेल्या माहिती वरुन खुनाच्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपी हैं सरताळा, ता. जावळी, जि.सातारा या परिसरामध्ये असल्याचे खात्रीशीर माहिती मिळताच आम्ही स्वतः व स्टाफ असे मा. वरिष्ठांचे परवानगीने दोन पथके तयार करुन शासकीय व खाजगी वाहनाने मु.सरताळा, ता. जावळी, जि.सातारा येथे गेलो. तेथील आसपासचे परिसरात आरोपीचा शोध घेत असताना कॅनलच्या लगत असलेल्या राज इंडियन व्हेज नॉनवेज हॉटेलच्या जवळ नमुद गुन्हयातील पाहिजे आरोपी हे त्याचे जवळील के.टी.एम दुचाकी गाडीवरुन येताना दिसले. त्यांना सोबतचे स्टाफचे मद्दतीने थांबविण्याचा प्रयत्न करत असताना ते पळुन जाऊ असता आम्ही व | स्टाफने त्यांना पकडून ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव सौरभ ऊर्फ सोन्या बाळासाहेब पानसरे, वय २३ वर्षे, रा. शिव अॅक्वा प्लॅटचे समोर, फलकेवस्ती, मोईगांव, ता. खेड, जि. पुणे मुळ गांव- कासारमळा, पानसरेवाडी (सुपा ) ता. बारामती, जि. पुणे असे असुन त्याचा साथीदार विधीसंघर्षित बालक आहे…त्याचे कडून गुन्हयात वापरलेली दुचाकी व साहीत्य जप्त करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख, पोलीस अमंलदार बाळासाहेब कोकाटे, मनोजकुमार कमले, महादेव जावळे, सोमनाथ बोऱ्हाडे, फारुक मुल्ला, अमित खानविलकर, सचिन मोरे, उमाकांत सरवदे, प्रमोद हिरळकार, अजित रूपनवर, विशाल भोईर, मारोती जायभाये, तानाजी पानसरे, नागेश माळी यांनी केली आहे.

