पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
खंडणी विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत अग्निशस्त्राचा वापर करुन गंभीर गुन्हे घडत असल्याने त्यास प्रतिबंध करण्याचे अनुषंगाने मा. पोलीस आयुक्त यांनी अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती काढून, कारवाई करणेबाबत आदेशीत केल्याने खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व अंगलदार अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणान्यांची माहिती काढत असतांना पोलीस अंमलदार आशिष बोटके व प्रदीप गोडांबे यांना मिळालेल्या बातमीवरून रेकॉर्डवरील गुन्हेगार १) सुनिल बाळासाहेब खेंगरे वय ३८ वर्षे रा. साठे कॉलनी, चिंचवडेनगर, चिंचवड, पुणे व त्याचा साथीदार २) अभिजीत अशोक घेवारे वय ३५ वर्षे रा. भाग्यश्री शर्मा याचे खोलीत, हाऊस नं. १०५७/०२ विजयनगर, अल्फान्सा स्कुल सगोर, काळेवाडी, पुणे यांना एस. के. वॉशिंग सेंटर समोर, मुंजोबा वसाहत, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवडेनगर, चिंचवड, पुणे येथून ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन किं.रू. १,२०,६००/- रु. वे ०३ देशी बनावटीचे पिस्टल व ०३ जिवंत काडतुसे (राऊंड) जप्त करण्यात आले असुन त्याचे विरुध्द चिंचवड पोलीस ठाणे येथे आर्म अॅक्ट कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..अटक आरोपी सुनिल बाळासाहेब खेंगरे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन, त्याचे विरुध्द दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल आहे.
सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. संजय शिंदे पोलीस सह आयुक्त, मा.वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. डॉ. प्रशांत अमृतकर, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली संतोष पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतिरिक्त कार्याभार खंडणी विरोधी पथक, तसेच खंडणी विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, सुनिल कानगुडे, किरण काटकर, व तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोहवा नागेश माळी यांचे पथकाने केली आहे.

