अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं.-9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 26 मे:- सावनेर येथे मराठी भाषेचे थोर लेखक, नाटककार, शेक्सपियर म्हणून ओळखले जाणारे कै. राम गणेश गडकरी यांच्या १३८ व्या जयंती निमित्त त्यांच्या अर्धकु्ती पुतळा, निवासस्थान आदी ठीकाणी राम गणेश गडकरी युवा मंच, गडकरी स्मृती निलयम आणि आकार रंगभूमी व सांस्कृतिक अकादमी शहरातील साहित्यप्रेमींच्या वतीने गडकरींना विनम्र अभिवादन करण्यात आले.
तसेच गणेश वाचन कक्षात राम गणेश गडकरी कला व वाणिज्य महाविद्यालयात भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी गणेश वाचनालयाचे अध्यक्ष अँड चंद्रशेखर बरेठिया, विश्वस्त अँड भूपेंद्र पुरे, स्व.राम गणेश गडकरी युवा मंचचे संस्थापक किशोर धुंडेले, आकार रंगभूमी व कल्चरल अकादमीचे आकाश पौनीकर, पुरातत्व विभागाचे अतुल गोटे, युवा सामाजिक कार्यकर्ते मोहन छत्रे, अतुल नलगुंडवार, नितीन पुरे, देशपांडे, अजय आलघरे, मुकेश झरबडे आदींची उपस्थितीत कै राम गणेश गडकरी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राम गणेश गडकरी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य सरकारने संरक्षित केलेले निवासस्थान फुलांच्या माळा आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गणेश वाचनालय उपयोगी.
राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्थापन करण्यात आलेला गणेश वाचनालय विद्यार्थ्यांसाठी प्रभावी ठरत आहे.संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बरेठिया व सदस्यांच्या प्रयत्नाने एमपीएससी, युपीएससी, एँम्स सारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत. शांत वातावरण असलेले स्वतंत्र वाचन कक्षात विद्यार्थी दिवसभर वेगवेगळ्या विषयावर अभ्यासकरित असतात. तर काही स्पर्धात्मक विषयांचा अभ्यास करून ते आपले भविष्य घडवण्यात मग्न असतात. गणेश वाचनालयचे अध्यक्ष अँड चंद्रशेखर बरेठीया यांनी याप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले की ग्रामीण परिसरातील होतकरू गरिब विद्यार्थ्यांना त्यांच्या सोईचे अभ्यासक्रम मुबलक प्रमाणात उपलब्ध करुण देने त्यांचे धेय्य आहे.त्याकरिता ते स्वतः व त्यांचे सहकारी विश्वस्त मंडळी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

