पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
वानवडी पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. १०/०५/२०२३ रोजी फिर्यादी हे त्यांचे मुळ गावी आंध्रप्रदेश येथे गेलेले असताना, दिनांक १०/०५/२०२३ ते दि. १६/०५/२०२३ रोजी या. चे दरम्यान कोणीतरी अनोळखी इसमांनी फिर्यादीचे घरातील (१) रु.४०,०००/- किंमतीची सोन्याची एक लहान चैन, (२) ६ ग्रॅम वजनाची. पट्टीची डिझाईन असलेली,६०,०००/- रु. किंमतीचे कानातील टॉप्स, (३) १० ग्रॅम वजनाचे गोलाकार डिझाईन असलेले ६०,०००/- रु. किंमतीचे कानातील टॉप्स. (४)१० ग्रॅम वजनाचे, खडयांची डिझाईन व लटकन असलेले जु.वा. किं.अं.६०,०००/- रु. किंमतीचे कानातील टॉप्स, (५) १० ग्रॅम वजनाचे साधी डिझाईन असलेले. जु. वा. किं.अं.१७,०००/- रु. किं.च्या चांदीच्या पट्टया (६) १५० ग्रॅम वजनाच्या, साखळी व घुंगरांची डिझाईन असलेली, जु.वा. किं.अं. (७) रू.१,०००/- किंमतीचे गोल्डन रंगाचे फिल्ट्रॉन कंपनीचे लेडीज घडयाळ, (७) ५०,०००/- रुपये किंमतीच्या भारतीय चलनातील नोटा, नोटांचा तपशील सांगता येत नाही. असे एकुण रु.२,८८,०००/- (दोन लाख अठ्ठयाऐंशी रुपये ) किंमतीचे दागिने व रोख रक्कम हे फिर्यादीचे राहते घराचा मुख्य दरवाजा कशाचेतरी सहाय्याने तोडून घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजाचे लॉक तोडून कपाट उघडून लॉकरमध्यून फिर्यादीचे संमत्ती शिवाय लवाडीच्या इराद्याने स्वतःच्या फायद्या करीता चोरुन नेले म्हणुन फिर्यादीने अनोळखी इसम यांच्याविरुध्द कायदेशीर तक्रार दिल्याने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप-निरीक्षक संतोष सोनवणे तपास पथक, वानवडी पोस्टे हे करत आहेत.
सदर दाखल गुन्हयाचे अनुषंगाने, वानवडी तपास पथकातील पोउपनि संतोष सोनवणे व सर्व पोलीस अंमलदार यांनी चिमटा वस्ती वानवडी भागातील संशयीत इसम यांचेकडे तपास करीत असताना, खाली नमूद आरोपीत यांना ताब्यात घेवून तपास केला करून तपास अनुषंगाने साक्षीदार यांचेकडुन दुजोरा मिळालेनंतर आरोपीत यांना अटक करून झाले तपासाप्रमाणे घर फोडी करणारे आरोपीत यांचेकडुन घरात लपवून ठेवलेले घरफोडी करून चोरी केलेले एकुण ३६ ग्रॅम वजनाचे सोने, तसेच १५० ग्रॅम वजनाचे चांदीच्या पाय पटया मनगटी घडयाळ असे एकुण रू.२,३८,०००/- रुपये किं.चे सोन्याचे चांदीचे दागिने मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. नमुद आरोपीतांची नावे अभिषेक सुभाष जाधव, वय २१ वर्षे, धंदा. राहणार सव्हे नं ८१, चिमटा वस्ती, वानवडी पुणे मुयर महेंद्र मोरे, वय २१ वर्षे, राहणार वानवडी पुणे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. सहपोलीस आयुक्त श्री संदिप कर्णीक, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस परि. ५, पुणे शहर श्री विक्रांत व मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर सौ. पौर्णिमा तावरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस निरिक्षक गुन्हे संदिप शिवले व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, पो. अंम अतुल गायकवाड, अमजद पठाण, संतोष नाईक, महेश गाढवे, संदिप साळवे, विष्णु सुतार, राहुल गोसावी, निलकंठ राठोड, अमोल गायकवाड, विठ्ठल चोरमले व मनिषा सुतार, सोनम भगत यांनी केली आहे.

