राहुल मसूरे, जिवती तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती:- जय विदर्भ पार्टीचे नेते तथा कट्टर विदर्भवादी सामाजिक कार्यकर्ते सुदामभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली जिवती येथील ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरू झाले पाहिजे म्हणून जण आक्रोश रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
जिवती तालुका हा आदिवासी आणि डोंगराळ भाग म्हणून ओळखल्या जातो आणि जिवती तालुक्यातील समस्या फार मोठ्या प्रमाणावर आहे त्या निकाली काढण्यासाठी जनतेला जर रस्त्यावर उतरावे लागत असेल तर ही सरकारसाठी लाजिरवाणी बाब आहे. जिवती तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरू करण्यात यावे, जिवती तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावे व भारी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात यावे म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे सुदामभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली जिवती येथे जण आक्रोश रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
जवळपास एक ते दीड तास रास्ता जाम करण्यात आले नंतर पोलिसांतर्फे आंदोलन कर्त्यांस अटक करण्यात आली. यावेळी आंदोलनाचे नेते सुदामभाऊ राठोड व त्यांचे सहकारी विशाल राठोड, कृष्णा चव्हाण,विनोद पवार, देविदास वारे, वसंत राठोड, माधव सोयाम,रमेश पवार, नामदेव राठोड, प्रवीण राठोड, कपिल जाधव, राजकुमार राठोड, गजू राठोड, बाबू पवार, नितेश वाघमारे, लक्ष्मण खुटेकर, गोचू पेंदोर, अशोक राठोड व तालुक्यातील नागरिक शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.