मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी
मुंबई:- च्या उपनगर असलेल्या नालासोपारा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नालासोपारा येथील रेल्वे स्टेशनवर दोन लहान मुलांसह झोपून असलेल्या पत्नीला अचानक उठवल आणि भरधाव चालत्या ट्रेन समोर फेकून हत्या करण्याचा खळबळजनक प्रकार वसई रोड रेल्वे स्थानकात सोमवारी पहाटेच्या सुमारास घडला आहे. सर्वी कडे खळबळ उडवणारा हा सर्व प्रकार रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर आरोपीने पती आपल्या दोन लहान मुलांसह घटनास्थळावरून पळाला असून असुन वसई लोहमार्ग पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत.
वसई रोड रेल्वे स्टेशनवर रविवारी रात्रीच्या सुमारास एक पती पत्नी आपल्या दोन लहान मुलांसह रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर झोपून होते. सोमवारी पहाटे 4:00 वाजताच्या सुमारास अवध एक्सप्रेस येण्याअगोदर गाळ झोपून असलेल्या आपल्या पत्नीला त्याने अचानक उठवल व अवध एक्स्प्रेस रेल्वे स्टेशन मध्ये दाखल होतात त्याने आपल्या पत्नीला रुळावर फेकून दिले. त्यानंतर आरोपी पती आपल्या दोन्ही लहान मुलांना घेऊन तिथून पसार झाला. या घटनेनंतर वसई लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. त्यानंतर एक्सप्रेसच्या लोको पायलटचा जबाब घेऊन सदर आरोपीचा शोध सुरू केला. यादरम्यान आरोपी लोकलने दादर व तिथून कल्याणपर्यंत गेल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी आता आरोपी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.