मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट शहरांमध्ये स्मार्ट (मॉडेल) रेल्वे स्टेशन उभारण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाला करण्यात आली आहे.
हिंगणघाट शहर हे वर्धा जिल्ह्यातील मोठे शहर असून नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांच्या सिमेलगत शहर आहे. तसेच हिंगणघाट शहर व ग्रामिण विभाग मिळून हिंगणघाट तालुक्याची लोकसंख्या ही अंदाजे 4.50 लाखाच्या वर आहे. शहराला अवती भोवती 300 गावे जोडले गेलेली आहे. व हिंगणघाट येथे व्यापारी वर्ग मोठा असून तसेच हिंगणघाट शहरातील कृषि उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे. शहरामध्ये व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तसेच हिंगणघाट रेल्वे स्टेशन हे चेन्नई-मुंबई-हैद्राबाद रेल्वे मार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्टेशन असल्यामुळे या रेल्वे स्टेशनला आदर्श मॉडेल रेल्वे स्टेशन करण्याची गरज आहे. हिंगणघाट शहरात बाहेर जिल्ह्यातील विद्यार्थी हे शिक्षण घेण्याकरीता प्रवास करीत असतात. सधास्थितीत असलेल्या रेल्वे स्टेशन हे जुन्या पद्धतीचे आहे. आतापर्यंत त्या रेल्वे स्टेशनचे आधुनिकरण करण्यात यायला पाहीजे होते परंतु ते करण्यात आले नाही. करीता आपण या रेल्वे स्टेशनला आदर्श मॉडेल रेल्वे स्टेशन बनविण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केली आहे.
हिंगणघाट शहरांमध्ये स्मार्ट रेल्वे स्टेशन उभारण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाला करण्यात आली. यामुळे आता हिंगणघाट रेल्वे स्थानक अमृत भारत योजने अंतर्गत स्मार्ट (मॉडेल) रेल्वे स्टेशन बन्याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे.

