ईसा तडवी, जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पाचोरा:- पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे घराचा कडी कोंडा कापून धाडसी चोरीची घटना समोर आली आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ माजली आहे.
दि.29 मे रोजी मध्ये रात्री सविता ज्ञानेश्वर पाटील राहणार नांद्रा या शेती व घर काम करणाऱ्या महिला ह्या आपल्या सूने सोबत नाद्रा येथे राहत असून त्यांची दोघे मुले पुण्याला नोकरी निमित्त राहत असल्याने त्यांनी दि 29 मे रोजी रात्रीचे जेवण करून सुमारे साडेदहा वाजता झोपण्या साठी त्या व त्यांची सुनबाई आपल्या घराला खाली कुलूप लावून जिन्यावरून घराच्या गच्ची वर झोपायला गेले परंतु सकाळी ज्यावेळेस ते जिना वरून खाली येण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा त्यांना जिन्याला बाहेरून कोणी तरी कडी लावल्याचे जाणवले तरी त्यांनी दुसऱ्या बाजूने घराच्या मुख्य दरवाजावर आल्यावर त्यांना त्यांच्या घराचा दरवाजाचा कडी कोंडा कापून कुलूप तूटलेली दिसले व घरात प्रवेश केल्यावर त्यांना आपला गोदरेज कपाटचे तिजोरी उघडी व समान ही अस्ता वेस्ता फेकलेला दिसला त्यामध्ये सोन्याचे सुमारे अंदाजे 73 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व काही रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला दिनांक 30 मे रोजी सविता ज्ञानेश्वर पाटील यांनी दिलेल्या फिर्याद नुसार पुढील चोरीचा तपास लावून चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने पोलीस विभागा तर्फे हातांचे ठसे बोटांचे ठसे घेण्यासाठी फिंगर प्रिंट एक्सपर्ट टीम व इतर चौकशी करून पंचनामा करण्याचे कार्य सुरू आहे.

