पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
वानवडी पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. २१/०५/२०२३ रोजी पहाटे ०४/०० वा.चे सुमारास पहाटे ०४०० च्या सुमारास सिनेसृष्टीत ज्युनिअर कलाकार म्हणुन काम करणारे फिर्यादी व त्यांचे दोन मित्र नामे हर्ष नाथे जिशान पटनी असे सासवड, जि.पुणे येथे मराठी पिक्चरचे शुटींकरीता जाण्याकरीता स्वारगेट येथून असलेली बस पकडणेकरीता निघालेले असताना, वानवडी पोलीस ठाणे हददीतील ९३ अॅव्हेन्यू मॉल, पुणे सोलापूर रोड येथील बी.टी. कपडे रोडचे लगत असलेल्या चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी थांबले असता, तेथे उभा असलेल्या एका इसमाने जाणीवपूर्वक फिर्यादीस धक्का मारून फिर्यादीस हाताला धरून खेचून त्याचेसोबत टपरी मागील हमरस्त्या लगतचे मोकळया व अडचणीच्या जागेत घेवून जावून, तेथे त्या इसमाचे उभे असलेले साथीदारापैकी एकाने त्याचेकडील धारदार हत्यार काढून फिर्यादीचे मानेवर ठेवले, व फिर्यादीचे पॅन्टच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने काढून घेवून “जान प्यारी है क्या, फोन प्यारा है, जान प्यारी है तो चले जाव” अशी धमकी दिली फिर्यादीला घेवून आलेल्या इसमाने फिर्यादीकडील पॅन्टचे खिशातून जबरदस्तीने असलेले पैसे काढून घेतले. तसेच फिर्यादीचा मित्र हर्ष व जिशान हेही फिर्यादीस पाहण्यासाठी आले असता तेथे असलेल्या आणखी दोन इसमांनी त्यांना हाताने मारहाण करून त्याचेकडील असलेले पैसे असा एकूण १९.६००/- रुपये ( एकोणीस हजार सहाशे रुपये फक्त ) किंमतीचं एक मोबाईल हॅन्डसेट व रोख रक्कम जीवे मारण्याची धमकी देवून जबरदस्तीने काढून फायदयाकरीता चोरुन नेली आहे. म्हणून फिर्यादीने वरील अनोळखी इसमांविरुध्द कायदेशीर दिल्याने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप-निरीक्षक संतोष सोनवणे तपास पथक, वानवडी पोस्टे हे करत आहेत.
सदर दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास पथक प्रभारी पोउपनि संतोष सोनवणे यांनी तपास करत असताना, बी.टी. कवडे रोड येथील गुन्हयातील घटनास्थळावरील साक्षीदार, सीसीटीव्ही फुटेज पाहणी करून व आयएमईआय सीडीआर यांचे तांत्रिक विश्लेषन करून, वानवडी पोलीस ठाणे कडील तपास पथकातील राठोड, गायकवाड, साळवे, सतार व सर्व पोलीस अमलदार यांनी मोठ्या शिताफिने व कौशल्याने गुन्हयातील खालील नमूद आरोपीत यांना जेरबंद करून अटक केली व त्यांचेकडुन गुन्हयातील व्हीवो कंपनीचा गुन्हयातील जबर चोर आरोपीतांची नावे खालीलप्रमाणे.
मोबाईल, कोयता, मोबाईल तसेच गुन्हयात वापरणेत आलेली दुचाकी मोपेड गाडी असे एकुण रू. ७४,२००/- रक्कमेचा गुन्हयातील मुददेमाल हस्तगत करणेत आलेला आहे.१)स्वप्नील दादा कोतवाल, वय २३ वर्षे धंदा. राहणार शिंदे वस्ती, हडपसर, पुणे२) महेश बबन गजेसिंह, वय. २९ वर्षे राहणार राहणार भिमनगर, मुंढवा, पुणे
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. सहपोलीस आयुक्त श्री संदिप कर्णीक, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उपआयुक्त परि-५ पुणे शहर श्री विक्रांत देशमुख, व मा.सहा.पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर सौ. पौर्णिमा तावरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस निरिक्षक गुन्हे संदिप शिवले व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, पो. अंम अमोल गायकवाड, विठठल चोरमले, अतुल गायकवाड, पोहवा / अमजद पठाण, संतोष नाईक, हरीदास कदम महेश गाढवे, विनोद भंडलकर, पोअं/ संदिप साळवे, विष्णु सुतार, राहुल गोसावी, निलकंठ राठोड, व मनिषा सुतार, सोनम भगत यांनी केली आहे.

