युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- सध्या नागपुर जिल्हासह कळमेश्वर येथे क्रिकेट सट्टेबाजीला प्रचंड उधाण आले. यातील सट्टेबाजांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश येत आहे. मागील १५ दिवसांत शहरात दोन ठिकाणी धाडी टाकून आरोपींवर कारवाई केली आहे.
कळमेश्वर येथे क्रिकेट सट्टेबाजी जोमात सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत मुख्य बुकीसह आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कळमेश्वरातील वार्ड क्र.४ येथील घरात सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सट्टा अड्ड्यावर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दि. ३० मे रोजी धाडी टाकल्या. आयपीएल क्रिकेट मॅच मधील गुजरात टायटन विरुद्ध चेन्नई सूपर किंग्स यांचे मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात ५३ हजार २०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील आरोपी अमोल प्रेमराज उके, वय 35 वर्ष राहणार वार्ड क्र.४ कळमेश्वर, रवींद्र खडसे रा. कळमेश्वर, कैलास उर्फ पिंटू साहेबराव कोहिटे वय २५ वर्ष रा.वार्ड क्र.१४ कळमेश्वर या तिघांना ताब्यात घेतले आहे.
आयपीएलवर जुगार खेळविल्या जात असल्याची गुप्त माहिती डिबी पथक यांना मिळाली त्यानुसार टाकलेल्या धाडीत तीघांना अटक करण्यात आली आहे. क्रिकेट जुगारासाठी लागणारे साहित्य,रोख रक्कम २००० रुपये,पाच मोबाईल संच,किम्मत ५१ हजार व ईतर दस्ताएवज मिळून एकून ५३ हजार २०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. माहिती मिळाल्यावरून सदरहु कारवाई पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक डाॅ.संदिप पखाले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक अनिल मस्के, पोलीस अधीक्षक राहुल झालटे, पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे,सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार,साहायक फौजदार चंद्रशेखर गडेकर, पोलीस हवालदार राजेंद्र रेवतकर,दिनेश आधापुरे, पोलीस नायक किशोर वानखेडे, उमेश फुलबेल यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
आरोपींविरुद्ध कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.स्टे.कळमेश्वर करीत आहे. सदरहु कारवाईमुळे कळमेश्वरात एकच खळबळ उडाली असुन क्रिकेट सट्टा खेळणा-यांचे धाबे मात्र चांगलेच दणाणले आहे .

