महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जम्मू कश्मीर:- वैष्णोदेवीला भाविकांना घेऊन जाणाऱ्या बस चा भीषण अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. भाविकांनी भरलेली बस पुलाचे रेलिंग तोडत सुमारे 50 फुट खोल दरीत कोसळल्याने 10 भाविकाचा मृत्यू झाला तर अनेक प्रवासी गंभीर असल्याने माहिती समोर येत आहे. ही घटना जम्मू-श्रीनगर महामार्गावर झाझ्झर कोटली भागात आज सकाळी सहा ते सातच्या सुमारास घडली.
या भीषण बस अपघातात मृतांत बहुतांश बिहारचे नागरिक आहेत. या अपघाताची माहिती कळताच बचाव पथक, सीआरपीएफ आणि पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. वेगाने बचाव कार्य राबविण्यात आले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या बस अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यासह अन्य प्रवाशांना सीआरपीएफच्या तुकडीने बाहेर काढले. जम्मूतील जीएमसी रुग्णालयात 57 जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच 10 नागरिकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आल्याचे सीआरपीएफने सांगितले. चालकाचे बसवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हे प्रवासी माता वैष्णोदेवी मंदिरात बाळाचे जावळ काढण्यासाठी जात होते.
चालकाची एक चुकी आणि भीषण अपघात. बाळाचे जावळ काढण्यासाठी माता वैष्णोदेवीला जाणारी बस कटराला जाण्याऐवजी श्रीनगरच्या दिशेने निघाली. अपघातस्थळाच्या दोन किलोमीटर अगोदरच बसने डावीकडे वळणे अपेक्षित होते, परंतु चालकाच्या लक्षात वळण आले नाही. त्यामुळे बस उधमपूर – श्रीनगरच्या दिशेला गेली.

