युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथील संविधान चौक येथे 28 मे 2023 ला प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत शाक्यपुत्र सागरजी उत्तर प्रदेश हे होते यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे हस्ते तथागत भगवान बुद्धाचे प्रतिरूप देऊन या चळवळीतील कलावंतांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी आमदार प्रकाश गजभिये कार्यक्रमाचे प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भदंत महास्थवीर हर्षबोधी व 365 दिवस बाबासाहेब आंबेडकर पुष्प हार अर्पण संकल्प समिती तर्फे संविधान चौक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख उपस्थितीत रतनल अहिरवार पुर्व राज्यमंत्री युपी (झाशी) उद्घाटक आरबि. एस. पुष्कर (मेरठ), डाॅ. पुरणचंद्र मेश्राम माजी रजिस्टार नागपूर विध्यापीठ, डॉ. सुरेश चौरे वरिष्ठ सर्जन नागपूर, प्रा.डॉ.युवराज मेश्राम ब्रम्हपुरी, स्वराजसिंगजी, डाॅ. जि. एस. गौतम, रमेश फुले नागपूर, दुधेशवर पेठे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तथा पुष्पहार अर्पण संकल्प समिती चे सर्व उपासक उपासिका महीला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर प्रबोधनकार गायक गीतकार अरूणभाऊ सहारे व गायीका सौ. छायाताई विलास मनोहर यांचे गायन प्रबोधन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. संगीत गायन कार्यक्रमात कलावंत अरूणभाऊ सहारे, छायाताई मनोहर. सम्राट डांगे, ईश्वर तेलंग, दादु सोनारे, अजय माहूरे यांनी कार्यक्रम सादर करून कार्यक्रमात बहार आनली. अतुल जामगडे, त्रिवेणी पाटील, प्रमिला टेंभेकर, विनोद जारोंडे, जोती बेले, सवाई थूल मॅडम व ईतर सर्व समितीचे महिलांनी भदंत हर्षबोधी यांचे नेतृत्वात अती परिश्रम करून कार्यक्रम संपन्न केला.

