माथरा व गोवरी दोन्हीं ग्राम वासियांच्या सहभागातून रस्ता जाम आंदोलन करण्याचा माजी जी. प. सभापती सुनील उरकुडे यांचा इशारा
तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी मो. 98224 77446
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- तालुक्यापासून नजदीक असलेल्या माथरा व गोवरी नाल्यावरील जुने पुल तोडून नवीन पुलांचे काम चालू असून ते अतिशय संथगतीने सुरू आहे. येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होत असून त्या पुलांचे काम पूर्ण न झाल्यास माथरा गोवरी व परिसरातील अनेक गावांचा संपर्क तालुक्याशी तुटेल व अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्याअनुषंगाने जिल्हा परिषदचे माजी सभापती तथा भाजपा तालुकाध्यक्ष सुनील उरकुडे यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभाग गाठून सहायक अभियंता यांना येत्या दोन दिवसात कामाची गती न वाढविल्यास दोन्ही ग्रामावशियांना घेऊन चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला व होणाऱ्या कार्यवाहीसाठी संपूर्णतः संबंधित कंपनी व प्रशासन असेल असेही निवेदनात सांगण्यात आले. त्याप्रसंगी दीपक झाडे, एम के सेलोटे, बालाजी दुर्गे, मारोती सपाट व इतर सहकारी उपस्थित होते.