शैलेश ओव्हाळ, पिपंरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- लोहगाव येथील गुरुद्वारा कॉलनीत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने झालेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील सुमारे दीडशे स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला.
यावेळी शिवसेना (शिंदे गट) जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध प्रवचनकार हभप पंकज महाराज गावडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिवसेना महिला आघाडी वडगाव शेरी मतदारसंघाच्या विभाग प्रमुख नेहा शिंदे यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमास शिवसेना सह संपर्कप्रमुख अजय भोसले, शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे, पोलीस निरीक्षक विलास सोंडे, योगेश शिंदे, युवासेना राज्य सचिव किरण साळी, शिवसेना महिला शहरप्रमुख पूजा रावेतकर, उपशहरप्रमुख प्रमुख सुनिल जाधव, शिवसेना वडगावशेरी मतदार संघ विभाग प्रमुख शंकर संगम, विभागप्रमुख वडगांवशेरी मतदारसंघ बापू खरात, प्रभाग प्रमुख येरवडा सुहास कांबळे, उद्योजक कृष्णात ढेंबरे, सेवानिवृत्त डीएसपी विठ्ठल शिंदे, शोभा शिंदे, पनवेलच्या माजी नगरसेविका लिना गरड तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

