परंपरा व पर्यावरण त्याची सांगड घालून आधार महिला समितीच्या वतीने दरवर्षीच राबविला जाणाऱ्या हा स्तृत्य उपक्रम: प्राचार्य शालिनी वंजारी.
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आधार फाउंडेशन महिला समितीच्या वतीने दरवर्षी वटवृक्ष लावून वटसावित्री साजरी केली जाते. यावर्षी स्थानिक आनंद नगर येथील साई मंदीर परिसरामध्ये वटवृक्षाचे रोपण प्राचार्य शालिनी वंजारी यांच्या शुभहस्ते तसेच प्राचार्य अर्चना मुडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये वटवृक्षारोपण करण्यात आले.
वटवृक्ष लावणे ही काळाची गरज ओळखून आधार फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविला जातो. वडाला अक्षय वृक्ष म्हणतात या वृक्षाचा कधीच क्षय होत नाही तो सतत वाढत जातो वडाच्या पारंब्या जमिनीतून पुन्हा पुन्हा उगवतात त्यामुळे झाडाचा विस्तार होतो व त्याला आयुष्य उदंड लाभते त्याच्या विशाल आकार व भरपूर पाने असल्याने तो अनेक विषारी वायू शोषून घेतो हवा शुद्ध ठेवतो त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सदापर्णी बहुवार्षिक वृक्ष म्हणजे वटवृक्ष होय. हा महाकाय वटवृक्ष थंड सर्वाधिक प्राणवायू देणारा असून त्याची साल व मूळ अतिशय गुणकारी समजली जात असल्यामुळे परंपरा व पर्यावरण यांची सांगड घालून वटवृक्ष रोपण व त्याचे संवर्धनाचे काम आधार फाउंडेशन च्या महिला समितीने हाती घेतलं आहे.
आधार फाउंडेशन मागील सहा वर्षापासून हिंगणघाट शहरामध्ये विविध जातींच्या वृक्षाचे रोपण व वृक्षवाटप करून आज पावतो शेकडो वृक्षाचे रोपण व त्याचे संवर्धनाचे कार्य आधार फाउंडेशन कडून होत आहे. तसेच परंपरा आणि पर्यावरण यांची सुंदर गुंफन करीत वटवृक्षाचे रोपन करुन अतिशय स्तृत्य उपक्रम आधार फाऊंडेशनच्या महिला समिती कडून राबविला जातो. तेव्हा सर्वानी आपआपल्या परिसरात जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षारोपण करा असे आवाहन त्यांनी ह्या प्रसंगी केले.
या वटवृक्षरोपणाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. माधुरी विहीरकर, माया चाफले, वीरश्री मुडे, ज्योती धार्मिक, वैशाली लांजेवार, स्वाती वांदीले, अनिता गुंडे, वैशाली हेडावू, मयूरी देशमुख, कविता घोडे, निलाक्षी बुरीले, प्रिती कलोडे, वैशाली सायंकार, प्रणिता तपासे, मिनाक्षी फुलबांधे, शारदा डुंबरे, लता गिरी, कल्पना पाटील, रोशनी नलवडे, केतकी मेढुंले, रेखा वाकडे, कविता कोसुरकर या सह अनेक महिलांनी सहकार्य केले.
आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती करीता आजच संपर्क साधावा. प्रशांत जगताप संपादक 9766445348-7385445348

