शैलेश ओव्हाळ, पिपंरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातील येरवडा भागात गुन्हेगारीने हौदोस घातला मारामारी, दरोडे, खुन, धमकी वेगवेगळ्या आमली पदार्थाची विक्री ह्यांसारख्या प्रकाराने जनता त्रस्त झाली आहे. जनतेच्या कायम मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. साध शहरातुन येरवड्यात यायच म्हणटल तर रिक्षा येत नाही बर्गर पिझ्झा सारख्या विक्री करणारे येरवड्यात येत नाही. बॅकेत कर्ज मिळत नाही मुला मुलीचे लग्नासाठी स्थळ मिळत नाही. ह्या सर्व भयानक समस्याना येरवडा भागातील जनतेला तोड द्यावे लागत आहे. त्यामुळे जनता प्रचंड मानसिक तनावाखाली वागत आहे. बहुसंख्य लोक मिळेल त्या भावाला आपली घरे विकुन दुसर्या ठिकाणी रहायला जात आहे. स्थलांतरन करीत आहे कारण येथे रहायच म्हणल तर कोणत्या तरी भाईला हप्ता देऊन किंवा त्याच मांडलिकत्व स्वीकारून तो देईल तशी वागणुक सहन करावी लागत आहे ह्या सर्व समस्याना पायबंद बसावा म्हणुन शिवसेनेचे उपशहरप्रमुख सुनीलभाऊ जाधव ह्याच्या नेतृत्वाखाली येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम ह्याना निवेदन देण्यात आले.
त्या प्रसंगी महिला विभाग प्रमुख नेहाताई शिंदे, विभाग प्रमुख बाप्पु खरात, प्रभाग प्रमुख सुहास कांबळे, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश चव्हाण, उपविभाग प्रमुख कुमार निदानिया, महीला उपविभाग सौ.निदानियाताई शाखा प्रमुख कुलदीप गागडे, संतोष देवकर, दिपक आहिरे इत्यादीजण शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.