अक्षदा संतोष आंबटकर ही 95.80 टक्के घेत ही हिंगणघाट तालुक्यातुन व्दितिय.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन सोसायटी व्दारा संचालित भारत विद्यालयाने आपल्या दैदिप्यमान निकालाची परंपरा कायम ठेवत दहावीचा निकाल 92.35 लागला असून यात अक्षदा संतोष आंबटकर ही 95.80 टक्के घेत ही हिंगणघाट तालुक्यातुन व्दितिय तसेच विद्यालयातुन प्रथम आली. तसेच अंकित संतोष आंबटकर हा 93.60 टक्के घेत विद्यालयातुन व्दितिय आला त्याच प्रमाणे वेदिका रंजित कहुरके 92.00 टक्के, यश कमलाकर थुल 90 टक्के, तनुश्री राजकुमार कहुरके 89.80 टक्के, अनुष्का संतोष सारंगधर 89.40 टक्के, तेजस्वी धनराज नहार 89 टक्के गुण संपादीत करित प्राविण्य श्रेणी प्राप्त केली.
हिंगणघाट शहरातील भारत विद्यालयाचे 10 च्या या परीक्षेत एकुण विद्यार्थी 301 परीक्षेला बसलेले होते यापैकी 278 विद्यार्थी उर्त्तीण झाले. यात 54 विद्यार्थी प्राविण्य श्रेणी, 84 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 98 व्दितीय श्रेणी, पास श्रेणी 42 विद्यार्थी उत्तिर्ण झाले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन संस्थचे अध्यक्ष गोकुलदासजी राठी, सचिव रमेश धारकर, उपाध्यक्ष श्याम भिमणवार संस्थचे सर्व संचालक सदस्य, मुख्याध्यापक बळीराम चव्हान, उपमुख्याध्यापक उदय भोकरे, पर्यवेक्षिका प्रतिभा आगलावे, पर्यवेक्षक विनोद नांदुरकर तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यानी अभिनंदन केले.
आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती करीता आजच संपर्क साधावा. प्रशांत जगताप संपादक 9766445348, 7385445348