माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली ऊपोषन स्थळी भेट.
संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर, दि.4:- नागपूर येथील संविधान चौकात ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नाला घेऊन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येत आहे. स्वाधारच्या धर्तीवर ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी आधार योजना लागू करण्यासह वसतिगृह आणि शिष्यवृत्तीसह विविध प्रश्नांवर साखळी उपोषण करण्यात येत आहे. यावेळी या साखळी उपोषण नागपूर दौऱ्यावर आलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी उपोषण स्थळी कार्यकर्त्यांची भेट घेतली.
यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रा. दिवाकर गमे, प्रदेश कार्याध्यक्ष बापू भुजबळ, नागपुर जिल्हा संघटक मनोज गणोरकर, महिला अध्यक्ष विद्या बहेकर, महानगर कार्याध्यक्ष आरिफ काझी, मिलींद पाचपोर, कविता मुंगळे, आरती पाचघरे, सुनयना यवतक, विशाल हजारे, विनय डहाके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी छगन भुजबळ म्हणाले की, ”ओबीसींच्या विविध प्रश्नावर आपला लढा कायम सुरूच आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधारच्या धर्तीवर आधार योजना लागू करणे, प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह निर्माण करण्यासाठी आपला शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण उपसमितीच्या माध्यमातून अनेक निर्णय घेतले होते. ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी आपला लढा सुरूच राहणार आहे.
दरम्यान, संविधान चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व उपोषणस्थळी सर्व महापुरुषांच्या प्रतीमेस भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.