Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सावनेर तालुक्यातील अवैध व्यवसायाचा पायाबंद करा, भाजपा पदाधिकारी यांची मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 5, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
सावनेर तालुक्यातील अवैध व्यवसायाचा पायाबंद करा, भाजपा पदाधिकारी यांची मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं. -9822724136

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर :- तालुक्यात क्रिकेट सट्टा, एमडी+जर्दा पावडर ड्रग्स व संघटित अवैध देह व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करून तालुक्यातील तरुण पिढीला जुगार, नशाबाजी आणि देह व्यवसायाच्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्याबाबतचे निवेदन पोलीस अधिक्षक विशाल आनंद व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.

सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा असलेल्या सावनेर तालुक्याला मागील वर्षभरापासून क्रिकेट सट्टा, ड्रग्स(एमडी पावडर+जर्दा पावडर) व संघटित देह व्यवसाय “लॉज च्या माध्यमातून” यांचे ग्रहण लागले आहे .तालुक्यातील शेकडो शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक, यांची तरुण पोरं, महाविद्यालयीन विद्यार्थी या अत्यंत वाईट व्यवसायांच्या विळख्यात अडकले असून आत्तापर्यंत अनेक युवकांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे. या तीन अवैध व्यवसायांमुळे ग्रामीण सामाजिक लोक व्यवस्थेमध्ये हळूच एक समाज विघटनकारी विचारधारेचा शिरकाव होण्यास सुरुवात झाली आहे. आमच्या निदर्शनास आलेल्या खालील बाबी प्रतिबंधात्मक उपाय योजना करिता आपल्या समक्ष सादर करीत आहोत.


सावनेर शहरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात क्रिकेट सट्टा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. ठिकठिकाणी क्रिकेट सट्टा घेणारे बुकिंग तयार झाले आहेत. सुरुवातीला किरकोळ व्यवसाय करणारे हे बुकिंग आत्ता कोट्याधीश झाले आहेत.कमी वेळात अति पैशांचा हव्यासापाई तरुण पिढी तसेच विद्यार्थी वर्ग या जुगारांमध्ये ओढला जात असल्याने क्रिकेट जुगार हा चिंतेचा विषय बनला आहे. सोबतच परिसरातील काही लॉजमध्ये संघटित देहव्यवसाय करणाऱ्यांच्या माध्यमातून “एमडी पावडर व जर्दा पावडर” या ड्रग्सची “पुरवठा साखळी तयार झाली असून ग्रामीण भागातील तरुणांना नशाबादीच्या आहारी लावण्यात जात आहे. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे ही की संघटित देह व्यवसायाच्या या घाणेरड्या व्यवसायात ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलींना देखील फूस लावून समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

जुगार आणि नशाबाजी मुळे कर्जबाजारी होऊन तालुक्यातील जवळपास 45 ते 50 तरुणांचा जीव गेला असून अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. जुगार, नशाबाजी, फोफावलेला संघटित देहव्यवसाय या सर्वांमुळे पालकांमध्ये चिंतेचा वातावरण निर्माण झालं असून यावर पोलिसांनी विशेष लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.
पोलीस विभागाने परिस्थितीचा गांभीर्य लक्षात घेता वरील तिन्ही मुद्द्यांचा एका सामाजिक दूरधर आजारामध्ये रूपांतर होऊन तालुक्यातील सामाजिक वातावरण दूषित होऊन आपराधिक वृत्तीचा पोषण व उद्रेक होण्याआधी क्रिकेट सट्टा, लॉज च्या माध्यमातून होणारा अवैध देहव्यवसाय व ड्रग्स या तीन गंभीर गोष्टी तात्काळ थांबविण्याच्या दृष्टीने पावले उचलावी अशी मागणी भाजपा पदाधिकारी अशोक धोटे यांनी पत्रपरिषदेतून केली.

याप्रसंगी अशोक धोटे प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा, नितीन राठी जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, संजय टेकाडे ना.जिल्हा कोषाध्यक्ष भाजपा,प्रकाश टेकाडे ना.जिल्हा अध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा, तुषार उमाटे महामंत्री सावनेर तालुका, सोनू नवधिंगे सावनेर तालुकाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा, दिनेश मांडवकर, चेतन केर्डे, विनोद बागडे, नरेंद्र ठाकूर, प्रमोद ढोले प्रामुख्याने उपस्थित होते

Previous Post

नागपूर: नात्याला काळीमा चुलत भावाने केला बहिणीवर अत्याचार, तीन महिन्याची गर्भवती झाल्याचे बिंग फुटले.

Next Post

अकोला येथील सर्वोउपचार रुग्णालयातील अपघात कक्षातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा, डॉक्टरला निलंबित करा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अकोला येथील सर्वोउपचार रुग्णालयातील अपघात कक्षातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा, डॉक्टरला निलंबित करा.

अकोला येथील सर्वोउपचार रुग्णालयातील अपघात कक्षातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा, डॉक्टरला निलंबित करा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In