प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नांदेड जिल्हातून पुरोगामी महाराष्ट्राला कलंकित करणारी घटना समोर आली होती. येथील बोधार गावात काही जातीवादी मानसिकतेच्या लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती का केली म्हणून येथील बौध्द समाजाच्या तरुणाला तलवारीने वार करून त्याची हत्या केली. त्यामुळे आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून वंचित बहुजन आघाडी शाखा हिंगणघाटच्या वतीने उपविभागीय अधिकारी मार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.
नांदेड ग्रामीण मधल्या बोधार गावी अक्षय भालेराव वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी का केली या कारणाने तेथील जातीयवादी, सनातनी गाव गुंडयांनी निर्घृण खून केला. या पुरोगामी महाराष्ट्रात असे जातीयवादी खून नेहमी होतं असतात ही घोर निंदनीय बाब आहे. म्हणून दोषीवर अट्रॅसिटी, हत्येचा कट व इतर कलमान्वये कठोर कारवाई करून दोषीची मालमत्ता जप्त करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, त्याच्या कुटुंबाला शासनाने तातडीने पन्नास लाख रुपयाची मद्दत करावी, अक्षय भालेराव यांच्या जखमी भावास शासकीय नौकरी देण्यात यावी, ही मागणी वंचित बहुजन आघाडीचे कुणाल वासेकर (जिल्हा उपाध्यक्ष) अशोक भाले तालुका अध्यक्ष, अजय डांगरे उपाध्यक्ष, सिद्धार्थ जामणकर, रवींद्र नारायणे, लोमेश बोबडे, गणेश ठाकरे, इतर कार्यकर्त्यांनी केली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा. प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348