वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावामधे भिमजयंती साजरी करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या वंचित बहुजन आघाडी चा पदाधिकारी अक्षय भालेराव याची गावातील गावगुंडांनी जातीय द्वेशातून निर्घृण हत्या केली.
गावामधे वर्षानुवर्षे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत नव्हती कारण जयंती ला गावातील कथित उच्चजातीय लोकांचा विरोध होता. परंतू यावर्षी अक्षय भालेराव व त्याच्या साथिदारांनी वंचित बहुजन आघाडी च्या वरिष्ठ पदाधिकारी तथा इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने प्रशासनाकडून रितसर परवानगी घेऊन शांततेत भिमजयंती साजरी केली. या घटनेचा द्वेश मनात ठेवत संधीच्या शोधात असलेल्या जातीयवादी गावगुंडांनी संधी मिळताच अक्षय भालेराव या नवयुवकाची हत्या केली.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात या घटनेबद्दल आक्रोश व्यक्त होत असतांनाच वंचित बहुजन आघाडी पुणे शहर अध्यक्ष मुन्नवर भाई कुरेशी, प्रफुल गुजर, अनिताताई चव्हाण, विशाल कसबे व परेश शिरसंगे यांच्या नेतृत्वात पुणे सोलापूर रस्ता रोको आंदोलन येथे करण्यात आले. या हत्याकांडातील इतरही आरोपिंना तात्काळ अटक करावी, विशेष सरकारी वकील नियुक्त करून सदर प्रकरण फास्ट ट्र्क कोर्टात चालविण्यात यावे व सर्व आरोपिंना फक्त फांशी ची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाचे फादर बाॅडी, महिला आघाडी, युवा आघाडी व माथाडी कामगार व ट्रान्सपोर्ट आघाडी चे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित व महिला वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते.