पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महंमदवाडी रोडवर एका सराईत गुन्हेगारावर गोळीबार करण्यात आला होता. ही घटना महंमदवाडी रोड परिसरात सोमवारी (दि. 5 ) रात्री साडेअकरा वाजता घडली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.सराईत गुन्हेगार पच्चीस उर्फ फैजान रमजान शेख ( वय 21, रा. सय्यद नगर, कोंढवा याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने चेतन बाळू जाधव (वय 21 रा. ससाणे नगर, अमित हाईट्स, हडपसर पुणे ) आणि यश सुनिल ससाणे (रा. मोहम्मदवाडी) यांना अटक केली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या पथकाने केली आहे.
पच्चीस ऊर्फ फैजान शेख याच्यावर शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. फैजान शेख आणि आरोपी यांच्यात पूर्वीपासून वाद आहेत . खान हा रात्री महंमदवाडी रोड परिसरातून जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला व ते पळून गेले. त्यातील एक गोळी शेख याच्या पोटात घुसली. त्यात तो जखमी झाला. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
घटनास्थळी अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा , पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा , सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर , वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर (खंडणी विरोधी पथक -2 , वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे , वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट , वरिष्ठ पोलिस निरीक्षक उल्हास कदम यांच्यासह इतर अधिकारी व पोलिस अंमलदारांनी दिली होती.दरम्यान, खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलिस अधिकारी व अंमलदार हे फायरिंग करणाऱ्या आरोपींच्या मागावर होते. त्याचवेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांना आरोपी हे जुना मोदी खाना कॅम्प परिसरात असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली. अखेर पोलिसांनी सापळा रचुन दोघांना अटक केली.
ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलिस उपायुक्त अमोल झेंडे ,सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक -2 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक चांगदेव सजगणे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण , पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव , पोलिस अंमलदार सुधीर इंगळे, पोलिस अंमलदार शंकर संपते, प्रदीप शितोळे, पोलिस राहुल उत्तरकर,पोलिस विनोद साळुंखे, पोलिस सदोबा भोजराव, पोलिस संग्राम शिनगारे, पोलिस पवन भोसले, पोलिस सुरेंद्र जगदाळे, पोलिस चेतन शिरोळकर, पोलिस सुरेंद्र जगदाळे, पोलिस सचिन अहिवळे आणि इतर पोलिसांनी केली आहे