राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथून एक खळबजनक घटना समोर आली आहे. येथील मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहाच्या रूम मध्ये 20 वर्षीय युवतीच्या विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. ही घटना मंगळवार दि 6 जून ला सायंकाळच्या सुमारास समोर आली. या युवतीच्या मृत्युदेह विवस्त्र अवस्थेत होता त्यामुळे या तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा संशय वर्तविण्यात येत असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे. मयत युवती मूळची अकोला येथील राहणारी होती. तिचे वडील पत्रकार आहे. तिच्या वडिलांना याबाबत माहिती देण्यात आली असून ते मुंबईकडे येण्यास निघाले आहे.व्व्ह
मरीन ड्राइव्ह येथे तारापोरवाला मस्त्यालयाच्या शेजारी सावित्रीबाई फुले वसतिगृह असून देशभरातून मुंबईत शिकण्यासाठी येणाऱ्या तरुणींना राहण्यासाठी या वसतिगृहात व्यवस्था आहे. पॉलिटेक्निकलमध्ये शिकणारी अकोल्याची ही 20 वर्षीय तरुणी गेल्या काही दिवसांपासून या वसतिगृहात राहत होती. चौथ्या मजल्यावर वास्तव्यास असलेली ही तरुणी मंगळवारी सकाळपासून खोलीबाहेर न आल्याने इतर तरुणी तिच्या खोलीजवळ गेल्या. तेव्हा ही घटना उजेडात आली. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. ताबडतोब पोलीस आपल्या ताप्या सह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ही तरुणी वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरील खोलीत ती विवस्त्र अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तरुणीचा मृतदेह शविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. तरुणीवर बलात्कार करून तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. याबाबत, पोलीस अधिक तपास करत आहे.
सुरक्षा रक्षक सकाळपासून गायब असल्याने एक पथक सुरक्षा रक्षकाचा शोध घेत होते. पण या गुन्ह्यातील संशयीत आरोपी सुरक्षारक्षक प्रकाश कनोजिया याने ग्रॅन्ट रोड आणि चर्नी रोड स्थानकादरम्यान ट्रेनखाली उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.

