मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक :- जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील 88 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्व राजकीय पक्षाने कमर कासल्याचे दिसून येत आहे त्यात बुधवार दि. 24 ऑगस्ट पासून नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची होणारी गर्दी विचारता घेऊन तहसील प्रशासनाने तयारी केली आहे.
राज्यातील पर्जन्याचे कमी क्षेत्र असलेल्या 51 तालुक्यांमधील 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यातील नाशिक, दिंडोरी आणि कळवण या तीन तालुक्यांतील 88 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. गेल्या शुक्रवारी (दि. 19) तहसीलदारांनी निवडणुकीची अधिसूचना स्थानिक स्तरावर प्रसिद्ध केली. त्यानंतर पुढील टप्प्यात बुधवार (दि. 24)पासून अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरण्यासाठी 1 सप्टेंबरला दुपारी 3 पर्यंतची अंतिम मुदत असणार आहे. 2 तारखेला दाखल अर्जांची छाननी, तर 6 तारखेला दुपारी 3 पर्यंत माघारीसाठीची वेळ देण्यात आली आहे