🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा:- महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक डी.एड आणि बि.एड विध्यार्थी नौकरीच्या प्रतिक्षेत आहे सन 2010 पासून शासनाने शिक्षक भरती बंद केली आहे, त्यामुळे ह्या विद्यार्थ्यावर एक प्रकारे अन्याय होत आहे. ऐकीकडे शासनाने डी.एड आणि बि.एड काॅलेजच्या फॅक्टरा सुरू केल्या होत्या व त्या विद्यार्थांना सामावून घेण्याबाबद कोणतेही ध्येय धोरण शासनाकडे नाही त्यामुळे आज अनेक विध्यार्थी रस्तावर फिरताना दिसत आहे त्याच काय भविष्य आहे हे शासन त्याबाबत कोणता ही निर्णय घेण्यास तयार नाही.
आज अनेक विद्यार्थ्यांनी नैराश्य पोटी आत्महत्या सुध्दा केला आहे. अश्या विद्यार्थाचे वय वाढत आहे. शिक्षण घेऊन सुद्धा नौकरी मिळत नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी काय करावे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सन 2017 ला शासनाने पवित्र पोर्टल सुरू केले ते आज परत बंद आहे त्यामुळे सगळा भोंगड कारभार झाला व शेवटी ते बंद पडले तरी शासनाने यावर त्वरीत तोडगा काढावा अन्यथा आदोलन करनात येईल शासनाने याची दखल घ्यावी अशे निवेदन वर्धा जिल्हा विकास आघाङीच्या वतीने वर्धा जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे महाराष्ट्र राज्य व उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व शिक्षन मंत्री महाराष्ट्र राज्य याना निवेदन देण्यात आले .
यावेळी प्रामुख्याने उपस्थित असलेले मनीष कांबळे, चारू आटे, संजय गायकवाड़, सिद्धार्थ ढोरे, शुभांगी गेडाम, सौ, दिपा पाटिल, आशीष भगत, मयूर नगराळे, जिवन उरकुडे, प्रदिप कोल्हे, प्रदिप मानिकपूरे, नुतन राठोड़, प्रदिप ढेगळे, प्रणय पाटील, संजय धाबर्डे, सौ अस्मिता भगत, देवेन्द्र त्रिपल्लीवार सह अनेक कार्यकर्ते उपस्थिति होते.