महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हैद्राबाद:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका मदिरातील पुजाऱ्याने आपल्या प्रेमिकेची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर या पुजाऱ्याने या महिलेचा मृतदेह मंदिरच्या मागे असलेल्या जागेत गाडला. ही घटना समोर येताच संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. साई कृष्णा वय 36 वर्ष असे प्रमिकेची हत्या करणाऱ्या आरोपी पुजाऱ्याने नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी साई कृष्णा नावाचा पुजारी विवाहित असून त्याला एक मुलगा आहे तरी याने मृतक अप्सरा नावाच्या तरुणी बरोबर प्रेमाचे संबंध प्रस्थापित केले. जेव्हा अप्सरा ही त्याच्या वैवाहिक जीवनात अडसर व्हायला लागली तेव्हा तिची निर्घृण पणे हत्या केली. ही घटना हैदराबाद राज्यातील शमशाबाद जवळ असलेल्या नारकुड़ा गावातील आहे. तरुणीची हत्याची घटना समोर आल्यानंतर मृतक अप्सराच्या कुटुंबाने पोलिसाना सांगितल की, या नराधम पुजारी साई कृष्णाने अप्सराला गर्भवती केलं होत. त्यानंतर आरोपी साई कृष्णा याने तिचा गर्भपात पण केला होता. मृतक तरुणीच्या कुटुंबांनी पुढे सांगितल की, अप्सराला पुजारी बरोबर लग्न करायचं होत. त्यामुळे ती आरोपीला लग्न करा अस म्हणत होती. यामुळे पुजारी साई कृष्णा याने प्लान करून तरुणींची हत्या केली आणि मृतदेह मंदिराचा मागे गळाला.
खाजगी कंपनी जॉबला होती अप्सरा… मदिरात पुजाऱ्याचे काम करणारा साई कृष्णा शरूरनगर परिसरात राहत होता. तो विवाहित असून त्याने मृतक महिलेचे आपल्या प्रेमाच्या जाळात ओढल. पोलिसांनी सांगितलं की हत्या करण्यात आलेली 30 वर्षीय अप्सरा ही नारकुड़ा गांव की राहणारी होती. अप्सरा ही एक खाजगी कंपनी मध्ये काम करत होती. ती शरूरनगर परिसरातील बंगारू मैसम्मा मंदिर मध्ये पुजाऱ्याचे काम करनारे 36 वर्षीय आरोपी सूर्या साई कृष्णा बिल्डिंग कॉन्ट्रैक्टर चे पण काम करत होता.
अशी झाली अप्सराची हत्या. मृतक अप्सरा हो आरोपी साई कृष्णा याच्या बरोबर सुलतानपल्ली येथील एका गोशाळेत गेली तिथे आरोपी कृष्णा याने तिची निर्घृण हत्या कली. हत्या केल्या नंतर आरोपी साई कृष्णा याने अप्सराचा मृतदेह मंदिर मागील परिसरात गाडला. त्यानंतर आरोपी साई कृष्णा याने स्वतः पोलीस स्टेशन येथे जाऊन अप्सराचा मिसिंग तक्रार दाखल केली.
पुजारीने स्वीकारला हत्याचा गुन्हा. तक्रार दाखल झाल्या नंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. त्यात आरोपी साई कृष्णा याला विचारपुस करण्यात आली. यावेळी त्याने पोलिसांसमोर आपण हत्या केल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह वर काढला. या प्रकरणी पोलिस तपास करत आहे.

