अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- माणसाचा मृत्यू झाल्यानंतर शरिराची राख होते.आपण केलेल्या नेत्रदान ने कोणत्याही अंध व्यक्तीला दृष्टी मिळु शकते. म्हणून दृष्टीदान दिनानिमित्त आपण मरणोत्तर नेत्रदान करणार असून नागरिकांनी नेत्रदान करावे असे आवाहन उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.
10 जून हा दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण त्या दिनाचे औचित्य साधून दृष्टीदानाचे महत्त्व व स्मरण राहील त्यामुळे मरणोत्तर नेत्रदानाची इच्छा असणाऱ्या व्यक्ती नेत्रपेढित जाऊन विहित नमुन्यात फॉर्म भरून दिला की मरणोत्तर नेतृत्वाची कार्य सत्कारणी लागेल. आज वैद्यकीय विज्ञान इतके पुढे गेले आहे की, एका व्यक्तीचे डोळे आणि पर्यायाने त्याची दृष्टी घेऊन ती दुसऱ्याला म्हणजे ज्या व्यक्तीला दृष्टी नाही अशा व्यक्तीला सहज देता येतात त्यामुळे त्या अंध व्यक्तीचे भविष्य उज्वल होऊ शकते दान देणारा अश्या व्यक्ती एक प्रकारे समाज सेवा करीत असल्याचे पुण्यश्रेय त्यांना मिळते. अशा सामाजिक स्वरूपाच्या केलेल्या दानामुळे त्या व्यक्तीच्या मनाला शांती सुख समाधान प्राप्त होते. आणी पुण्यही मिळते.
डोळे हे ईश्वराने मानवाला दिलेली फार मोठी देणगी आहे परंतु काही व्यक्ती यापासून वंचित असतात काही कारणास्तव त्यांना अंधत्व प्राप्त होते. जन्मानंतर त्यांना अंधत्व येते त्यामुळे अशा व्यक्ती जगाचे सौंदर्य पाहू शकत नाहीत सौंदर्याने भरलेली सृष्टी ज्यांना पाहत येत नाही ते या सृष्टी सौंदर्याला मुकतात या व्यक्तींना नेत्र मिळाले तर ते सृष्टीचा आनंद घेऊ शकतील माणुसकीच्या नात्याने दृष्टी असणाऱ्या व्यक्तीने दृष्टिहीन व्यक्तीला नेत्रदान केले तर दात्याच्या जीवनाचे नक्कीच सार्थक होईल व अंधांना सृष्टीचे सौंदर्य पाहता येईल म्हणून मी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना तथा सामाजिक कार्यकर्ता उद्या मरणोत्तर नेत्रदान करणार असून जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदान करावे असे आवाहन उमेश सुरेशराव इंगळे यांनी केले आहे.

