प्रवीण जगताप, प्रतिनिधी
सोलापूर:- जील्हातील बार्शी येथील एक संतापजनक बातमी समोर आली आहे. अंतरजातीय प्रेम विवाह केलेल्या नव विवाहितेला तिच्या सासू व ननंद मोठ प्रमाणात त्रास देत होते. शिवाय, तिच्याच पतीने तिला आग लावून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार नव विवाहित महिलेने बार्शी येथील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
प्राप्त माहितनुसार, पीडित नव विवाहिता ही पारधी समाजाची असून तिचा पती हा मराठा समाजाचा आहे. दोघांनी मागील वर्षी 03 सप्टेंबरला आळंदी येथे रजिस्टर पध्दतीने विवाह केला आहे. लग्ना नंतर काही दिवसांनी तू पारधी समाजाची आहे, तुझ्यामुळे आम्हाला समाजात
इज्जत नाही याचा आम्हाला त्रास होतो, असे म्हणून
सुनेसोबत वाद घालून मारहाण व शिवीगाळ करत होते. तसेच सासू सास-यांचे ऐकूण माझे पती हे मला माहेरी पाठवत नव्हते. मी माझे पाहुण्यांकडे जाणेसाठी
विचारल्यास मला जातीवरुन बोलत होते. परंतु आम्ही
दोघानी प्रेमविवाह केला असल्याने मी नाईलाजाने पतीसोबत सोलापूर रोड बार्शी येथे सासू-सास-यांपासून वेगळे राहत होते, असे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
21 ऑगस्ट रोजी मी व पती दोघेच घरी होतो. त्यावेळी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास मी मला माझ्या आईकडे जायचे आहे असे पतीस म्हणाले असता पतीने तुला जायचे असेल तर तु कायमच निघुन जा तुझ्यामुळे आमची इज्जत गेली असे म्हणून माझेसोबत भांडण करायला सुरुवात केली. आमच्या वाद झाल्याने पती रागारागात घरातून निघून गेले. थोड्यावेळानी दुपारी
1:25 वाजताच्या सुमारास माझे पती परत घरी आले.
त्यावेळी त्यांचे हातात त्यावेळी त्यांनी प्लॅस्टीकचे
बाटली मध्ये पेट्रोल आणले होते. पतीने रागाचे भरात
‘मला बेदम मारहाण करायला सुरवात केली मी त्यांना
मारू नका म्हणून विरोध करत असताना तु पारध्याची आहे म्हणून आमची इज्जत गेली. तु कशाला जाते मीच तुला मारून टाकतो असे म्हणून सोबत आणलेल्या
प्लॅस्टीकचे बाटलीतले पेट्रोल माझे डोक्यावरून संपूर्ण
अंगावरील कपड्यावर ओतले. पतीने माझा हात पिरगाळून आजुबाजुला काडीपेटी हुडकत असताना मी जिवाच्या भितीने आरडाओरडा सुरु केला. माझे
ओरडण्याचा आवाज ऐकुण आमचे शेजारी राहणा-या
दोन मुलांनी घरात येवून बाहेर काढले. त्यानंतर मी
रस्त्यावरून येणारे जाणारे लोकांकडुन मोबाईल घेवुन
आईला फोन करुन बोलावून घेतले. आम्ही पोलिस ठाणेस आली व आम्हाला दवाखाना यादी दिल्याने ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे उपचारास गेली असता तेथील डॉक्टरांणी सिव्हील हॉस्पीटल उस्मानाबाद येथे रेफर केले व तेथे औषधोपचार केल्यानंतर महिलेने तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, संपूर्ण अंगावरील कपडयावर पेट्रोल ओतून
जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून महिलेने तक्रार
दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत
आहेत.