युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान कर्मचारी संघटना आयटक कळमेश्वर च्या वतीने उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियाना अंतर्गत जे गाव पातळीवर काम करतात व वंचित घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यास मोलाचे योगदान देत आहे. अशा कॅडर कर्मचाऱ्यांनी विविध मागणीसाठी कळमेश्वर पंचायत समिती समोर आंदोलन पुकारले आहे.
सर्व कॅडर या ग्रामीण भागातील महिला कामगार असून त्यांना वाढती महागाई लक्षात घेऊन किमान 24 हजार रुपये देण्यात यावे बँक सखी, कृषी सखी यांना कामासाठी तालुकास्तरावर प्रवास करावा लागतो तसेच जिल्हा केंद्रात किंवा तालुक्याच्या मीटिंगमध्ये येण्या जाण्याकरिता करावी लागते लागत असल्याने प्रवास खर्च देण्यात यावा. मोबाईल रिचार्ज ड्रेस कोड आणि फोटो आय कार्ड देण्यात यावे उमेद अभियाना अंतर्गत सर्व कामगारांना दिवाळी बोनस दहा हजार रुपये देण्यात यावे. बँक सचिवाना दोन दोन बँकेच्या व्यवहार कारभार बघावा लागतो तर कॅडरचे काम नसतानाही त्यांना दुसऱ्या कॅडरची कामे करावी लागत असल्याने अतिरिक्त कामाचा आर्थिक बोजा देण्यात यावा. प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत सर्व उमेद अभियानातील कामगारांना विमा संरक्षण देण्यात यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या
या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष तारा भांगे सचिव सुनिता गोरे सदस्य पल्लवी गौरखेडे, सिंधुताई सोमकुवर, उज्वला पाटील, मनीषा मोजनकर, निशा जामगडे, दीप्ती बहादुरे, माला कोवाड, शारदा ताजने, मनीषा साळवे, माधुरी रेवतकर, लीला रोगे सह तालुक्यातील संपूर्ण महिला कॅडर कर्मचारी उपस्थित होते.