मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथे वाळू माफियांविरुद्ध उपजिल्हाधिकारी आणि महसूल विभागाने धडक कारवाई करत या वाळू चोरीचा स्पर्दाफास केला आहे. ही कारवाई हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार यांच्या घराच्या जवळ 100 मीटर डागा मिल परीसरात केली आहे. त्यामुळे शहरातील वाळू वाहतूक करणाऱ्या तस्करात धडकी भरली आहे.
वर्धा जिल्हा प्रशासनाने वाळू माफियांच्या मुसक्या आवळन्यास सुरुवात केल्याने स्थानिक महसुल विभाग खडबडून जागे झाले असून अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझले यांच्या पथकाने दि 14 जून रोजी डागा मिल परिसरातील खाली जागेवर अवैधरित्या 200 ब्रास वाळूची चोरी केलेला साठा जप्त केला आहे.
हिंगणघाट तालूक्यातील विविध भागातील नदी पात्रातुन मोठया प्रमाणात वाळू चोरी होत आहे, मागील स्थानिक प्रशासन कोमात आणि वाळू तस्करी जोमात सुरू होती. या वाळू तस्करांनी गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात अवैध रित्या उपसा करून पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात नाश केला आहे. आणि यातून मोठ्या प्रमाणात माया जमवली आहे. यात अनेक नेत्याचे कार्यकर्ते पण सामील असल्याने कारवाई करावी कुणावर अशा प्रश्न प्रशासनाला पडतो. पण अप्पर जिल्हाधिकारी यांनी वाळू तस्करांवर कारवाई केली असल्याने तालूक्यातील वाळू चारांचे धाबे दनालले आहे. महसूल विभागाच्या दंडात्मक कारवाई कडे संपुर्ण तालूक्याचे लक्ष लागले आहे.

