पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
गुन्हे शाखा युनिट 2 पिंपरी चिंचवड शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- निगडी पोलीस स्टेशन गुंन्हा रजिस्टर नंबर 348/2023 भा.द.वि.कलम 307,504,34 प्रमाणे आज रोजी दाखल गुन्हयातील आरोपीत यांनी जखमी साईप्रसाद गोपाल हेगडे वय 39 रा. दळवीनगर चिंचवड यास ब्लेड दाखवुन 500/- रुपयाची मागणी केली व पैसे दिले नाही या कारणावरुन सिमेंटचा पेवर ब्लॉक व विटांनी डोक्यावर मारुन गंभीर जखमी केले आहे.
गुन्हयातील पाहीजे आरोपीत यांचा गुन्हे शाखा युनिट 2 कडून शोध घेत असतांना सपोफौ शिवानंद स्वामी यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकरवी मिळाले बातमीवरुन गुन्हे शाखा युनिट 2 चे सपोफौ माने, स्वामी, पोहवा 658 संतोष इंगळे, पोना 1924 नामदेव कापसे, पोकॉ 1920 अजित सानप, 1931 शिवाजी मुंढे, 2097 उध्दव खेडकर अशांनी सापळा लावुन दवाबाजार चिंचवड स्टेशन येथे आरोपीत नामे 1) सनी उर्फ तुषार सुरेश गायकवाड वय 29 वर्षे रा. सांगवी बँकच्या पाठीमागे चिंचवड स्टेशन आनंदनगर चिंचवड 2) आदेश उर्फ भैया बप्पा गायकवाड वय 23 वर्षे रा. नगरसेवक काळुराम पवार यांचे ऑफीस शेजारी मालधक्का आनंदनगर चिंचवड यांना शिताफीने ताब्यात घेवून चौकशीमध्ये आरोपीत यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने गुन्हयाचेकामी निगडी पोस्टेला हजर केले आहे….

