नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी 9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- गेल्या महिन्याभरापासून मखमली तलाव येथील भारत गॅसची जयसी गॅस सर्विस एजन्सी आपल्या ग्राहकांची बुकिंग घेत नाही. गॅस सिलेंडर पुरवठा बंद केला आहे त्यामुळे या एजन्सीचे सर्व ग्राहक सिलेंडर चा पुरवठा मिळत नाही म्हणून मखमली येथील कार्यालयात गेली अनेक दिवस चक्कर मारीत आहेत परंतु हे कार्यालय दुसरीकडे स्थलांतरित केल आहे असे तेथे बाहेर बसलेले त्यांच्या दोन कर्मचारी सांगत होते. परंतु गेले दोन दिवस झाले ते कर्मचारी बसायचे बंद झाले असून त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे नागरिकांना गॅस सिलेंडर पुरवठा कुठून मिळणार याबाबत चिंता निर्माण झाली. याबाबत सर्व ग्राहक चरई येथील खासदार राजन विचारे यांच्या कार्यालयात संपर्क केला असता माजी स्थानिक नगरसेविका नंदिनी विचारे यांनी त्या ठिकाणी तात्काळ भेट देऊन नागरिकांची बाजू लक्षात घेऊन खासदार राजन विचारे यांचे पत्र स्थानिक नौपाडा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय धुमाळ यांना देऊन त्या जयसी गॅस सर्विस एजन्सी धारकाला शोधून नागरिकांना वेठीस धरल्या कारणाने त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली.
तसेच या गॅस सर्विस एजन्सींना परवाना देत असताना त्यांची आवश्यक परवानगी असते ती उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनाही पत्र देऊन संबंधित एजन्सी धारकावर कारवाई करून ग्राहकांना दुसऱ्या एजन्सी गॅस धारकांकडून पुरवठा तात्काळ सुरू करावा अशी मागणी या पत्रामध्ये केली आहे.
एक गृहिणी म्हणून ही समस्या मी समजू शकते, शाळकरी मुलांच्या उद्यापासून शाळा सुरू होत असल्याने नागरिक गावावरून आपल्या घरी परतले आहेत. परंतु सिलेंडर नसल्यामुळे जेवण कसे शिजवावे ? त्यामध्ये वाढत्या महागाईत सिलेंडरचे वाढलेले दर ? हा मोठा प्रश्न घरातील गृहिणीला पडला आहे. यासाठी मी पुढाकार घेऊन गॅस सिलेंडर पुरवठा कसा लवकरात लवकर सुरु होईल यासाठी प्रयत्न करीत आहे.

