उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- आज सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री सुरू असून पोलिसांनी यावर धडक कारवाई सुरू केली आहे. अशीच एक कारवाईत करत मिरज पोलिसांनी 7 किलो गांजा जप्त करून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.
मिरज एसटी स्टँड परिसरातून रिक्षामधून गांजा विक्री करण्याकरिता जात असल्याची गोपनीय माहिती महात्मा गांधी पोलिस ठाणे येथे मिळाली होती. त्यानुसार मिरज एसटी स्टँड परिसरात पोलीस पथक तयार करून सापळा रचण्यात आला. ऑटो रिक्षा एसटी स्टँडजवळ आली असता पथकाने रिक्षा अडवून रिक्षा चालक वैभव राजू कनशेट्टी वय 30, रा. मिरज याला ताब्यात घेतले.यावेळी पोलिसांनी रिक्षाची झडती घेतली असता एका पोत्याच्या प्लास्टिक पिशवीत एक लाख 70 हजार रुपये किंमतीचा 6 किलो 800 ग्राम वजन इतका गांजा आढळून आला. या गुन्हात वापरलेले सुमारे दीड लाख रुपये किंमतीची रिक्षा असा 3 लाख 20 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार वैभव राजू कनशेट्टी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा, पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. याबाबत अधिक तपास महात्मा गांधी पोलीस करीत आहेत.

