🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
हिंगणघाट:- येथील शिवाजी वार्ड येथे राहणाऱ्या संजय साड़वे यांच्या 9 वर्षीय मुलाने अथर्व साड़वे याने दि.13 ऑगस्ट खंडाला येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट कूडो टूर्नामेंट मध्ये बॉयज ग्रुप 33 किलो ग्राम गटात पहिल्या फेरीतच आपल्या प्रतिस्पर्धी ला चित करून सिल्वर मैडल आपल्या नावावर केलं. सिल्वर मैडल जिंकून अथर्व साड़वे याने संपूर्ण हिंगणघाट शहराची खेळात मान उंचावली आहे.
अथर्व साड़वे या 9 वर्षीय खेळाडूने पहिल्याच राऊंड मध्ये प्रतिस्पर्धीला चीत केले. त्याची खेळा प्रती असलेली रुची आणि शिकण्याची जिद्द बघून अथर्व साड़वे राष्ट्रीय पातळीवर आपले नाव करेल अशी भावना निर्माण झाली आहे.
आपल्या पहिल्याच सामन्यात विजय प्राप्त केल्या मुळे अथर्व ने हिंगणघाट व आपल्या परिवाराचे नाव रोशन केले आहे. पापा संजय साड़वे, मम्मी मोना साड़वे, बड़े पापा कवडू साड़वे, मम्मी, वेदिका, शुभम, नेहा, मामा प्रवीण अखाड़े, मामी, मौसी, मौसा, मुंडे परिवार, परिसर से बन्ना अत्त्या, जाकीर काका, ग़ज़ल दीदी, अर्चना काकू या सर्वानी अथर्व ला आशीर्वाद देऊन समोरच्या प्रगति साठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.