सरपंच देविदास सातपुते व पोडसा वासीयांनी मानले गुरुबक्षीणी कंपनीचे आभार.!
राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी. मोबा. नंबर 9518368177
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- तालुक्यातील सरपंच संघटनेचे अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, तसेच पोडसा गावचे सरपंच असा तिहेरी पदभार स्वीकारून तालुक्यातील सर्वसामान्याच्या समाजसेवेत व विकास कार्यात गुंतलेले देविदास सातपुते हे पूर्वीपासूनच सेवा देण्यात व सहकार्य करण्यात अग्रेसर आहेत. आणि त्यांच्या या सेवेचे व सहकार्याचे फलित गावात कंपनीने करून दिलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणातून दिसून आले.
गोंडपिपरी तालुक्यात सुरू असलेल्या भंगाराम तळोधी मार्गे पोडसा गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम गुरुबक्षीनी कंट्रक्शन कंपनी करत असून त्यांच्या सुरू असलेल्या उत्कृष्ट व मजबूत रस्ता बांधकामाची वाहवा दोन तीन वर्षे पासून सतत परिसरातील नागरिकांकडून होत आहे. दरम्यान सदर कंपनीचे काम सध्या पोडसा गावाकडे सुरू असून, गावात जाणाऱ्या रस्त्याचे जवळपास ५० ते ६० मीटर अतिरिक्त अडीच ते तीन लाख रुपये कंपनीने खर्चून डांबरीकरण करून दिले. ज्यामुळे गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याला विशेष सुंदरता आली असून, गुरुबक्षीनी कंट्रक्शन कंपनीचे प्रमुख श्री.निंबाळकर व प्रोजेक्ट इन्चार्ज श्री.ठाकरे आणि गुरुबक्षिणी कंट्रक्शन कंपनी यांची पोडसा गावात वाहवा होत असून, सरपंच देविदास सातपुते यांचे सह संपूर्ण गावकरी कंपनीचे आभार व्यक्त करत आहेत.
विठ्ठलवाडा-भंगाराम तळोधी मार्गे जाणाऱ्या पोडसा गावापर्यंतच्या महामार्गाचे काम सुरू असून जवळपास नांदगाव हेटी जवळ व सकमुर या दोन गावांच्या मध्यांतर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण व मजबूत झालेले आहे. दरम्यान या दोन वर्षात रस्त्याचे बांधकाम सुरू असताना कंपनीला व कंपनी प्रमुख आणि प्रोजेक्ट इन्चार्ज यांना विविध अडचणींचा सामना करावा लागला, ज्यामध्ये प्रशासकीय, शासकीय, विभागीय, रस्त्यालगतचे शेतकरी, अशा विविध अडचणी आल्या. परंतु अशा अनेक अडचणी दूर करण्यासाठी कंपनी प्रमुख श्री. निंबाळकर व प्रोजेक्ट इन्चार्ज श्री. ठाकरे यांना ता.सरपंच संघटना अध्यक्ष, कृ.ऊ.बा.स. संचालक तथा सरपंच देविदास सातपुते यांचे बरेच सहकार्य लाभले. सातपुते यांच्या सहकार्याचे फलित कंपनीने गावातील जाणाऱ्या रस्त्याला करून दिलेल्या डांबरीकरण रस्त्यातून दिसून आले. ज्याचा लाभ आज संपूर्ण पोडसा गावाला झाला असून, सर्व पोडसा गावकरी समाधान व्यक्त करत आहेत.

