श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी बीड जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्यांची भेट घेऊन व्यापार्यांचे विविध प्रश्न समजून घेतले. व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्यांनी विविध विषयांवर पालकमंत्री सावे यांच्याशी चर्चा केली.
यावेळी यामध्ये प्रामुख्याने जीएसटीच्या विषयावर तसेच देशातील विविध व्यापारी समस्यांवर व्यापारी महासंघाचे मार्गदर्शक श्री.सत्यनारायण लाहोटी यांनी चर्चा केली तसेच कार्याध्यक्ष श्री. अशोक शेटे यांनी अन्न भेसळ सुरक्षा कायद्या अंतर्गत लायसन्स नूतनीकरनासाठी जो अवाजवी दंड आकारला जातो त्या बद्दल त्यात सुधारणा करावी असे त्यांना निवेदन दिले. त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
सदरील सदिच्छा भेट ही श्री.सत्यनारायणजी लाहोटी यांच्या ’आयोध्या’ या निवासस्थानी पार पडली. या वेळी बीड जिल्हा भाजपा चे अध्यक्ष श्री.राजेंद्रजी मस्के, सलीम जहांगीर, बीड जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री.भास्करराव जाधव, कार्याध्यक्ष श्री.अशोकजी शेटे. सचिव श्री. तुकारामजी सोळंके, बबलू पटेल, सूरज लाहोटी, विजय लाहोटी, वाय.जनार्दन राव, प्रकाशजी कानगावकर आदी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.