सीमा सुरूशे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्हातील पातूर तालुक्यातील जांभरून गावातील मारुतीचे नवसाला पावणारे अत्यंत जागृत देवस्थान आहे. हा मारुती भक्तांच्या श्रद्धेला फळ देणारे दैवत म्हणून या देवस्थानची ख्याती आहे. त्यामुळे राज्यातील आणि परराज्यातील अनेक भागातील नागरिक या मंदिरात येतात.
रामनवमी ते हनुमान जयंतीला येथे भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. मारुती हा सर्व भक्तांना पावतो, त्यांची संकटे दूर करतो, अशी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये श्रद्धा आहे. जांभरून गावात असणाऱ्या या मंदिरातील मारुतीची मूर्ती अत्यंत देखणी आहे. हे मंदिर केव्हा व कोणी बांधले याचा निश्चित उल्लेख सापडत नाही. पण वेळोवेळी अनेक भक्ताच्या सहकार्याने बांधण्यात आले. हे मंदिर शेकडो वर्षांपूर्वीचे असल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगतात.
यासंदर्भात एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. जांभरून जवळून 40 किलोमीटर अंतरावर वसाली सीतानानी नावाचे देवस्थान आहे. भगवान रामाचा दुत जमुवंत नावाचे अस्वल श्री. रामाचा निरोप घेऊन सितामातेला सांगण्यासाठी जात असताना तो या गावात एक दिवस मुक्कामी राहाला. त्यावेळी जमुवंत नावाचे अस्वल ने जो दगड झोपताना आपल्या उशाशी घेतला होतो तो हा प्रसिद्ध मारुती म्हणून स्थापित करण्यात आला.
येथे प्रत्येक शनिवारी मोठ्या प्रमाणात भक्त आणि भाविकांची गर्दी असते कुणी नवस करायला येतात तर कुणी नवस फेडायला येतात. भाविक लोक या मारुतीला आपले समस्या सांगून श्रद्धेने आणि भक्ती भावाने हा मारुती भगताच्या नवसाला पावतो. पाच शनिवार या मारुतीची भक्तिभावाने उपासना केली तर मागितलेले प्रत्येक नवस पूर्ण होतो. अशी लोकांची आस्था आहे.
तसा हा मारुती त्वचा रोग चर्म रोगासाठी प्रसिद्ध आहे. लोक ओषधी म्हणून मारुती समोरील जळत असलेला दिव्यातील तेल आणि अंगारा त्वचारोगावर लावतात. त्यांचा तो त्वचा रोग इसबगोल, खाज, खरूज, गचकरण हे सर्व त्वचा रोग येथे बरे होतात. नवस केला नंतर ते भाविक बरे झाल्यानंतर येथे नवस फेडायला येतात यावेळी येथे अन्नदान करतात.
मंदिराच्या जवळच एक विशाल काय वढाचे वृक्ष आहे. जे शेकडो वर्षापासून असल्याचे गावातील नागरिकांनी सांगितल. माणसाने काही ओलांडल तर ते या वृक्षाच्या खालून गेले तर ते पूर्ण बरे होतात असे गावातील नागरिकांनी सांगितल.
रामनवमी ते हनुमान जयंती निम्मित जांभरून गावातील मारुती जवळ अखंड हरिनाम भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येथे. यावेळी हजारो भाविक भक्त भागवत आयकण्यासाठी येथे येतात.
हनुमान जयंतीला यात्रा उत्सव..
हनुमान जयंतीला जाभरून गावातील मारुती येथे यात्रा उत्सव साजरा केला जातो. यावेळी आजू बाजूच्या गावातील हजारो नागरिक यात सहभागी होतात.

