मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- शहरातील रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून त्यात प्रामुख्याने सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न अति महत्त्वाचे असुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने राजवाडा मार्गावर सार्वजनिक शौचालय व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, आदी मागण्या घेऊन नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
अहेरी शहरात दैनंदिनी शाळकरी विद्यार्थी, शासकीय निमशासकीय कर्मचारी, तेलंगणा राज्यातील नागरीक महीला वर्ग मोठ्या प्रमाणात कामकाजा करिता अहेरीला येतं असतात मात्र या ठिकाणीं सार्वजनिक शौचालयाची सोय नसल्याने नागरीक सह महिलांची अत्यन्त गैरसोय होत आहे. तसेच रस्ता, पिण्याचे पाणी, आरोग्य सांडपाण्याचा निचरा असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अरूंद रस्ता एकूण रस्त्यावर दुचाकी व चार चाकी वाहने उभी असल्याने आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन विभागाची गाडीही एखाद्या ठिकाणी जाऊ शकणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली असुन याकडे नगरपंचायतचे सर्रास पणे दुर्लक्ष होत असल्याचे मनसे कार्यकर्तेनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गडचिरोली उपजिल्हा अध्यक्ष सोनल वाकुडकर, शाखा अध्यक्ष अमोल रामटेके, तालुका अध्यक्ष नागेश तोरेम आदी मनसे कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते.

