विश्वास त्रिभुवन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहमदनगर:- जिल्हातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली असून त्याच्यावर भादंवि कलम 366, 366 (अ), 376 पोक्सो कलम 4, 5 (फ), 6, 11, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय गोविंद गोडसे असे आरोपीचे नाव आहे. तो मुलीच्या स्कूलबस चालक आहे त्यानेच हे घृणास्पद कृत्य केले.
फूस लावून मुलीला घेऊन पसार…. माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझे आई-वडील तुला त्रास देतात ते मला पाहवत नाही, आपण त्यांच्यापासून लांब निघून जाऊ, असे बोलत मुलीला फूस लावून आरोपी घरातून घेऊन गेला. त्यानंतर त्याने मुलीवर लैंगिक अत्याचारही केला. मुलगी बेपत्ता होताच मुलीच्या आई-वडिलांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ मुलीचा शोध सुरु केला.
सापळा रचून आरोपीला अटक…. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल ट्रॅक करत, सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून आरोपीचा ठावठिकाणा शोधत होते. आरोपीला याची खबर लागताच त्याने मुलीला दुसऱ्या दिवशी राहुरी फॅक्टरी येथे सोडून दिले. मुलगी सापडताच मुलीची चौकशी केली असता तिने सर्व प्रकार कथन केला. यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला. आरोपी 16 जून रोजी रात्री राहुरी फॅक्टरी परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून शिताफीने आरोपीला अटक केली.
पुढील तपास सुरू…पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात पोलीस करत आहे. मुलीवर ज्या ठिकाणी अत्याचार करण्यात आला त्या ठीकाणी पुरावे गोळा करून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या आणि प्रतिनीधी बनाण्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप 9766445348/7385445348

