वन मंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी दिला होता बिबट्याला तत्काळ पकडण्याचा आदेश. वन विभागाच्या मेहनतीने बिबट जेरबंद.
सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधि
चंद्रपूर:- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विसापूर मधील वाघाला जेरबंदी करण्याचे वनविभागला तात्काळ आदेश दिले होते. त्यामुळे वन विभागाणे बिबट्याला जेरबंद केले आहे. त्यामुळे यापरीसरातील नागरिकांनी बिबट्याच्या भयातून सुटका झाली.
बिबट्याला जेरबंद करण्याच्या कामगिरीत योगदान देणारे संदीप श्रीहरी पोडे भाजपा यु. मो. जिल्हा उपाध्यक्ष, नरेश भोवरे RFO बल्लारपूर, कोमल गुगलोक RO बल्लारपूर, अमित चहान्दे वनरक्षक आणि गोविंदा बुटले, विपुल गौरकर, शंकर नागराडे, सौरभ गिरसावळे, चेतन भायेर, नितीन पादे, विशाल ठाकरे, संदेश टेकाम, प्रदीप दुर्वे व वन विभागाचे सर्व सहकारी सदस्य या सर्वांनी दिवस आणि रात्र रात्र जागून गेल्या 2 दिवसात घरी न जाता बिबट्याला पकडण्याकरिता मेहनत घेतली होती.
परिसरात बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी 3 ते 4 पिंजरे लावण्यात आले होते. त्यात रात्र भर निगराणी करणे, cctv कॅमेरे लावून मॉनिटरिंग करणे स्वतः वन विभागाचे अधिकारी सुद्धा थांबायचे या प्रकरची सर्व मेहनत केली व बिबट्याला अखेर जे्रबंद केला त्या बद्दल या सर्वांचे मनापासून आभार आपण सर्वांनी खूप अशी मेहनत घेतली आहे. मनःपूर्वक आभार – संदीप पोडे भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष )चेतन पाल बल्लारपूर विधानसभा सोशल मीडिया संयोजक.