परतुर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतुर:- दैठना खुर्द ता. परतूर जि. जालना या गावातील ग्रामपंचायतने ठराव घेऊन गावातील अवैध देशी दारू विक्री पूर्णपणे बंद केली असतांना देखील येथे अवैध देशी दारू विक्री राजरोस खुले आम पणे विक्री सुरू असून हा अवैध देशी दारू विक्री व्यवसाय जो व्यक्ती हा अवैध देशी दारू विक्री व्यवसाय करतो आहे तो स्पष्ट म्हणतो की माझ कोणी काहीच करू शकत नाही. त्यामुळे या दारू विक्रेत्यांवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही. अवैध दारु विक्रीचे रॅकेट स्ट्रॉंग असल्याचे दिसून येते.
दैठना खुर्द गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री वाढल्याने गावातील अनेक कुटुंबात वाद होतात तर सध्या शाळा बंद असल्याने लहान मुलं घरीच असतात आणि दारुड्यांचे संस्कार लहान मुलांवर पडतात, यामुळे गावातील अनेक लहान शाळकरी मुले सुद्धा दारूच्या व्यसनाधीन झाली असल्याची चित्र सध्या गावात दिसून येत आहे. गावातील अनेक महिलांचे उध्वस्त होत असलेले संसाराचा विचार करुन अवैध दारुधंद्यावर आळा घालण्याची मागणी होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते सचिन गरड यांनी पाहणी केली असता दैठना खु. येथे नाबालिक मुलाला खुलेआम देशीदारू विक्री व्यावसाय सुरू असलेचे दिसून आले अवैध देशी दारू विक्री करणारास विचारणा केली असता. तो म्हणतो बातमी लावल्याने माझा माझा अवैध धंदा देशी दारू विक्री बंद होत नाही असे अवैध देशी दारू विक्री करणार म्हणत आहे हा अवैध देशी दारू विक्री व्यवसाय त्वरीत बंद झाला पाहिजे.
आपल्या परिसरातील बातम्या आणि प्रतिनीधी बनाण्याकरिता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 7385445348 / 9766445348