अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- खासगी शाळांची पुस्तके खरेदी ची सक्ती थांबवा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी अकोला जिल्हाच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या काही वर्षापासून अकोला जिल्हातील शाळांनी काढलेल्या परिपत्रकानुसार ठराविक दुकानातूनच पालकांना गणवेश वह्या, पुस्तके आणि इतर शालेय साहित्याची खरेदी करावी लागत आहे. अशा प्रकारे सक्ती केली जात असल्याने, दुकानदारही मार्केट पेक्षा अधिक दराने शालेय साहित्याची विक्री करत आहेत. यासाठी शाळांना दुकानदारांकडून दहा ते वीस टक्के कमिशन मिळत असल्याचा सांगितले जात आहे. खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांना कोणत्या दुकानातून गणवेश घ्यावा, पुस्तके वह्या घ्यावी, याची माहिती पालकांना दिली जाते. या शाळांशी टाय अप असलेली काही ठराविक दुकाने आहेत. तेथुनच गणवेश घेतला तर ठीक अन्यथा शहर फीरले तरी दुसरीकडे गणवेश मिळणार नाही. अशी विशिष्ट यंत्रणाच तयार करण्यात आली आहे. याच दुकानांमधून गणवेश घेण्याची पालकांना सक्ती केली जाते. त्यावेळी शाळेतूनच रस्त्यावरील एका मोठ्या कपड्याच्या दुकानाचा पत्ता असलेले पत्रक देत तिथून कपडे घ्या असे सांगितले जाते. त्या दुकानात एक तर प्रचंड गर्दी असते, अन कपड्याचे दर देखील अधिक असतात. इतर दुकानांमध्ये हे कपडे मिळत नसल्याने हे महाग असले तरी तेथुनच कपडे घेणे भाग पडते. हे कपडे व्यवसायिकांना माहीत असल्याने त्याचीही मंजुरी वाढली आहे. शाळा व दुकानदार यांच्यात मिली भगत आहे. त्यामुळे पालकांचे आर्थिक शोषण होत आहे.
म्हणून ठराविक दुकानांमधूनच शाळेने केलेली गणवेश वह्या पुस्तकात खरेदीची सक्ती त्वरित थांबविण्यात यावी व नागरिकांची आर्थिक लूट थांबवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

